Manoj Jarange Maratha Reservation  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Manoj Jarange News : खुर्ची गेली तरी मुख्यमंत्री मागेपुढे पाहणार नाहीत, आरक्षण देतीलच; जरांगेंना ठाम विश्वास

Mangesh Mahale

Pandharpur : "मराठा आरक्षणाबाबत निर्णय देण्याची क्षमता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे. आरक्षणासाठी खुर्ची गेली तरी मागेपुढे पाहणार नाहीत. पण आरक्षण देतीलच," असा ठाम विश्वास जरांगेंनी व्यक्त केला. ते पंढरपुरात बोलत होते.

मुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतील, त्यामुळे पुढचे आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असे जरांगे म्हणाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. "भुजबळांचे कार्यकर्ते सभांना अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भुजबळ इतक्या खालच्या स्तराला जातील असं वाटलं नव्हतं," असे जरांगे म्हणाले.

छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला विरोध केल्यामुळे मराठा समाजात त्यांच्याविषयी नाराजी आहे. भुजबळांना मराठा समाजाने मोठी मदत केली आहे. त्यांना शह देण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर आरक्षणाबाबत तीव्र लढा उभारत आहेत.

"मराठा समाजाला आरक्षण देण्यास माझा विरोध नाही. मात्र, ओबीसी समाजाला आरक्षण खूप कमी आहे, त्यामुळे मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, असे माझे म्हणणे आहे. माझ्या एकट्याचेच नव्हे, तर इतर अनेक नेत्यांचेही हेच मत आहे. त्यामुळे इतरांचे नाव घेऊन जरांगे का बोलत नाहीत?, असा सवाल करत मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा सगळ्यांना बोला, नाही तर त्याला राजकीय वास येईल, असे भुजबळांनी जरांगे-पाटलांना सुनावले होते.

"आम्ही शांततेच्या मार्गाने कार्यक्रम घेत आहोत. पण भुजबळ वातावरण दूषित करीत आहेत. अन्य लोकांना पुढे करून ते आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे, कारण ते सत्ताधारी आहेत," असा आरोप जरांगेंनी त्यांच्यावर केला आहे .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT