Chandrashekhar Bawankule News : फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसणारे आज आपला पक्ष शोधताहेत; बावनकुळेंचा टोला

Maharashtra Politics : 2024 मध्येही मोदी पंतप्रधान व्हावेत, अशी जनतेची इच्छा आहे, असे बावनकुळे म्हणाले.
Chandrashekhar Bawankule News
Chandrashekhar Bawankule News Sarkarnama
Published on
Updated on

Sangli : "देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला ते आज घरी बसले आहेत. आपला पक्ष कुठे आहे हे शोधत बसलेत," असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

"नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठी कामे केली आहेत. कोरोना काळात मोदींनी कोरोना लस उपलब्ध करून दिली आणि आपला जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केला. याआधी इंग्रजांनीसुद्धा चंद्रावर झेंडा फडकवला नव्हता. मात्र, नरेंद्र मोदींनी चंद्रावर झेंडा फडकवला. मोदींनी देशाचा मान सन्मान वाढवला आहे," असे बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule News
Manoj Jarange News : जरांगे-भुजबळांमध्ये वात पेटली; "शिंदे-फडणवीसांनी भुजबळांना समज द्यावी." : जरांगे आक्रमक

लोकसभा मतदारसंघ निवडणूक तयारीच्या महाविजय 2024च्या दौऱ्यानिमित्ताने चंद्रशेखर बावनकुळे तासगाव दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन भाजप विरोधात इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली आहे. या आघाडीतून त्यांचा पंतप्रधान करणार आहेत आणि हिंदू संस्कृती संपवण्याचे काम ते करणार आहेत. हे आपल्याला मान्य आहे का? 2024 मध्येही मोदी पंतप्रधान व्हावेत, अशी जनतेची इच्छा आहे, असे बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule News
Ajit Pawar News : अजितदादा पालकमंत्री झाल्याने त्यांची राष्ट्रवादी जोमात, तर भाजप...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com