Maratha Reservation News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation News : ओबीसी नेत्यांचा दावा जरांगे पाटलांनी खोडून काढला; म्हणाले,"आरक्षण मिळेपर्यंत सरकारला सुटी नाही..."

Maharashtra Politics : ओबीसी नेत्यांची भूमिका ही सरकारची भूमिका नाही.

Mangesh Mahale

Hingoli : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा राज्यात दौऱ्यात सुरू आहे. हिंगोलीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते, माजी मंत्री छगन भुजबळ यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. मराठा समाजाने छगन भुजबळांना बळ देण्याचे काम करू नये, असे मनोज पाटील म्हणाले. हिंगोलीत मराठा आंदोलकांची भेट घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

मराठा समाजाला सरसकट ओबीसी दाखले देणार नसल्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांच्या बैठकीत दिला असल्याचा दावा ओबीसी नेत्यांनी केला होता. मात्र, आता ओबीसी नेत्यांचा हा दावा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा लढा उभा करणाऱ्या जरांगे पाटलांनी खोडून काढला आहे.

जरांगे पाटलांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. "ओबीसी नेत्यांची भूमिका ही सरकारची भूमिका नाही, सरकारने समिती स्थापन केली आहे, आमच्याकडे वेळ मागितला आहे, त्यामुळे मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र मिळणार असल्याचे पाटील म्हणाले. आरक्षण मिळेपर्यंत सरकारला सुटी नाही," असेही पाटील म्हणाले. पाच तारखेला सोलापुरात जरांगे पाटलांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मनोज जरांगे यांनी सरकारला ४० दिवसांचा अवधी दिला आहे. ४० दिवसांत आरक्षण न मिळाल्यास पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. त्यानुसार, मराठा समुदायाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडून कुणबी नोंदी तपासल्या जात आहेत. लाखो दस्तावेज तपासल्यानंतर संपूर्ण मराठवाड्यात केवळ पाच हजार कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार का? हा नवा पेच निर्माण झाला झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT