Maratha Reservation News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : मोहोळमधील २१, तर माळशिरसमधील २० गावांत नेत्यांना ‘नो एन्ट्री’

Mohol, Malshiras News : माळशिरस तालुक्यातील तब्बल २० गावांनी पुढाऱ्यांना ‘नो एन्ट्री’चा निर्णय घेऊन जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur News : आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली महिनाभराची मुदत संपल्याने त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावोगावी आंदोलने करण्यात येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील २० गावांत, तर मोहोळ तालुक्यातील २१ गावांत नेत्यांना ‘नो एन्ट्री’ करण्यात आली आहे. (Maratha reservation ; 'No entry' for leaders in 21 villages in Mohol and 21 in Malshiras)

मराठा समाजाला कुणबी समाजाचे दाखले देण्याची मागणी करत मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले होते. त्यांचे उपोषण सोडण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले होते, त्या वेळी मराठा समाज आणि जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली होती. ती मुदत नुकतीच संपली आहे, त्यामुळे जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, आरक्षणाचा प्रश्न आता गावोगावी पेटला आहे. राज्यातील अनेक गावांनी नेत्यांना प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावकऱ्यांनी असा निर्णय घेतला आहे. त्यात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या तालुक्याचाही समावेश आहे. माळशिरस तालुक्यातील तब्बल २० गावांनी पुढाऱ्यांना ‘नो एन्ट्री’चा निर्णय घेऊन जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. याशिवाय सहा गावांत साखळी उपोषणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांचे वेळापूर, तोंडले, बोंडले, तांदूळवाडी, पंचवीस चार, कोळेगाव या गावांत जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार साखळी उपोषण करण्यात येत आहे. तर देशमुखवाडी, निमगाव, तोंडले, बोंडले पंचवीस चार, कोळेगाव, गारवाड, चौंडेश्वरवाडी, शिंदेवाडी, वेळापूर, तांदूळवाडी, वाघोली, संगम आदींसह २० गावांत पुढाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे.

मोहोळ तालुक्यातील २१ गावांतही नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तालुक्यातील मसले चौधरी, भांबेवाडी, वाघोली, वाफळे, वाळूज, शेजबाभूळगाव, वडवळ, मोहोळ, अंकोली, साबळेवाडी, पापरी, अर्धनारी, कामती खुर्द, अर्जूनसोंड, पोफळी, अर्जुनसोंड, नांदगाव, कोथाळे, भोयरे, ढोकबाभूळगाव आदी २१ गावांचा त्यात समावेश आहे.

माजी आमदार रमेश कदम यांचा पाठिंबा

दरम्यान, मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांची भेट घेऊन आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. दररोज एका गावातील नागरिक उपोषणात सहभागी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT