Maratha Reservation : बारामतीत अजितदादांच्या कार्यक्रमास विरोध; प्रशासनाने तातडीने बोलावली बैठक

Baramati News : बारामती शहर आणि तालुक्यात कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना फिरू देणार नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आलेली आहे.
Malegaon Sugar Factory News
Malegaon Sugar Factory NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला विरोध दर्शविला आहे. हे बारामतीत घडल्याने कारखाना प्रशासन, मराठा क्रांती मोर्चा आणि पाेलिस प्रशासनाची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात काय तोडगा निघतो, हे पाहावे लागणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण बारामती तालुक्याचे लक्ष असणार आहे. (Maratha community opposes Ajit Pawar's program in Baramati)

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यातूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला येऊ नये, अशी भूमिका समाजाने घेतली आहे. त्यानंतर कारखाना प्रशासनाने तातडीने आज (ता. २७ ऑक्टोबर) दुपारी दोन वाजता ही बैठक घेण्याचे ठरविले आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Malegaon Sugar Factory News
Sule Reply To Modi : मोदींच्या पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंचे उत्तर; ‘याच सरकारने पवारांना पद्मविभूषण...’

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील अनेक गावांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे बारामती शहर आणि तालुक्यात कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना फिरू देणार नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आलेली आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता. २८ ऑक्टोबर) होणार आहे. मात्र, त्या कार्यक्रमाला सकल मराठा समाजाने विरोध केला आहे. अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव सहकरी कारखान्याचा मोळी पूजनाचा कार्यक्रम होऊ नये, असं क्रांती मोर्चाचं म्हणणं आहे. पवार यांच्या हस्ते मोळी पूजनाचा कार्यक्रम झाला, तर मराठा समाजाच्या रोषाला सोमोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आलेला आहे.

Malegaon Sugar Factory News
Sushilkumar Shinde's Uturn : सुशीलकुमार शिंदेंच्या मनात नेमकं काय?; राजकीय निवृत्तीवरून एका दिवसात ‘यू टर्न’

मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध नाही. कारखान्याचे संचालक अथवा सभासदांनी मोळी पूजन करावं, पण कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाच्या कार्यक्रमला बोलावू नये. याबाबतचे पत्रक सकल मराठा समाजाकडून देण्यात आलेले आहे.

दरम्यान, सकल मराठा समाजाच्या इशाऱ्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कारण दोन दिवसांपूर्वी झालेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात अजित पवारांना घेराव घालण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे पुन्हा गोंधळ होऊ नये, यासाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे प्रशासन दक्ष झाले आहे.

Malegaon Sugar Factory News
Police Recruitment : मीदेखील गृहमंत्री होतो, म्हणून काय गार्डला पोलिसाची वर्दी देणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com