Chandrakant Patil Security Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrakant Patil Security : चंद्रकांतदादांच्या घराला छावणीचे रूप; सुरक्षेसाठी तब्बल १०० पोलिस

Manoj Jarange Indefinite Hunger Strike : मराठा समाजातील वाढता संताप पाहता कोल्हापूर पोलिस प्रशासनाने सर्व पोलिस स्टेशनला अलर्ट राहण्याच्या सूचना

Rahul Gadkar

Maratha Reservation Protest in Kolhapur : मराठा आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक झाल्यानंतर खासदार आणि आमदारांच्या घरांना टार्गेट केले जात आहे, तर अनेक राजकीय पक्षांच्या कार्यालयाला आग लावल्याच्या घटना घडल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनीदेखील खबरदारी घेतली असून, राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संभाजीनगर येथील घराला पोलिस छावणीचे रूप आले आहे, पाटील यांच्या सुरक्षेत वाढ केली असून, तब्बल १०० पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवलेला आहे. (Latest Marathi News)

पोलिस ठाण्यांना अलर्ट

कोल्हापुरात सकल मराठा समाजाकडून दसरा चौक येथे साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. सोमवारी सकल मराठा समाजाकडून राज्य सरकारचा निषेध नोंदवला होता. राज्य सरकारच्या मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष व उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी या आंदोलनादरम्यान केली होती.

राज्यात मराठा आरक्षणावरून समाज आक्रमक होत असताना आंदोलनाला हिंसक वळण लागत असल्याचे चित्र आहे. बीड आणि हिंगोली जिल्ह्यांत जाळपोळीच्या घटना घडलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोलिसांनी खबरदारी घेतल्याचे दिसून येते.

पाटील यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील राहत्या घरी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान, मराठा समाजातील वाढता संताप पाहता कोल्हापूर पोलिस प्रशासनाने सर्व पोलिस स्टेशनला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हापुरातील एसटी सेवा सुरळीत

राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल संताप व्यक्त होत असताना राज्य परिवहन मार्गाकडूनदेखील खबरदारी घेण्यात येत आहे. आंदोलनादरम्यान एसटी महामंडळाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, यासाठी परिस्थिती पाहूनच निर्णय घेण्यात येत आहे.

सोमवारी कोल्हापूर विभागातील इचलकरंजी आगारातून निघालेली एसटी छत्रपती संभाजीनगरला जाणारी बार्शी येथून परत आली. सोमवारी एक फेरी रद्द करण्यात आली. परिस्थिती पाहूनच एसटी बंदचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाकडून देण्यात आली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT