CM Eknath Shinde : मराठा आंदोलकांनी नेत्यांना गावबंदी केली असताना, मुख्यमंत्री शिंदे अचानक कोल्हापूर दौऱ्यावर!

CM Eknath Shinde News : जाणून घ्या, कोल्हापुरात एवढ्या तातडीने नेमकी कोणाची भेट घेणार आहेत?
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde in Kolhapur : राज्यात मराठा आरक्षण आंदोलनावरून वातावरण कमालीचं तापलेलं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे राज्यभरात आंदोलनं होत आहेत. एवढच नाहीतर आंदोलकांनी राजकीय नेते मंडळींना थेट गावबंदीच केली आहे.

मराठा समजातील तरुण आरक्षणाची मागणी करत आत्महत्या करत आहेत. त्यामुळे विरोधकही राज्य सरकारला धारेवर धरत आहेत. अशा परिस्थितीत आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक कोल्हापूरला पोहाेचणार असल्याची माहिती समोर आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

CM Eknath Shinde
Tanaji Sawant News : तुळजापुरात मंत्री तानाजी सावंतांनी मराठा आंदोलकांना दिला असा चकवा; प्रशासनाची खेळी ठरली यशस्वी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. आज रात्री ते कोल्हापुरात दाखल होणार असून, कोल्हापुरातील कणेरी मठावरील अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांची ते भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या पाच महिन्यांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन वेळा 'या' मठाला भेट दिली आहे.

मात्र, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक भेटीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अतिशय गुप्तता पाळून मुख्यमंत्री येत असल्याची माहिती समोर आली आहे. कारण या अगोदर कोल्हापूर जिल्ह्यात मंत्री हसन मुश्रीफ यांना मराठा समाजाच्या आंदोलकांनी दोन ठिकाणी अडवले होते. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या या अचानक दौऱ्याबाबत प्रचंड गुप्तता पाळली आहे.

CM Eknath Shinde
Maan Maratha News : माणमध्ये गावबंदीचा वणवा; चाळीस गावांनी केली नेत्यांना बंदी

तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक दौऱ्याने कोल्हापूर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. सायंकाळी ही बातमी समजल्यानंतर पोलिसांनी मोठा बंदोबस्त वाढवला असून, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वेताेपरी दक्षता घेतली जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com