Narendra Patil, Suresh Khade sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : माथाडी नेते कामगार मंत्र्यांवर नाराज; दिला पुन्हा आंदोलनाचा इशारा

Suresh Khade माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी २१ सप्टेंबर, २०२२ रोजी संयुक्त बैठक आयोजित करून एक महिन्याच्या आत प्रश्नांची सोडवणुक करण्याचे आश्वासन दिले होते.

Umesh Bambare-Patil

Dhebewadi News : शासनाच्या कामगार, गृह, पणन खात्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांची येत्या दहा ते १५ दिवसांत सोडवणुक करण्याचे आश्वासन राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे Suresh Khade यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकित दिले होते. मात्र, त्यांच्याकडून प्रश्नांची अद्याप सोडवणुक झालेली नाही. त्यामुळे याबाबत माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील Narendra Patil यांनी नाराजी व्यक्त करत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी २१ सप्टेंबर, २०२२ रोजी संयुक्त बैठक आयोजित करून एक महिन्याच्या आत प्रश्नांची सोडवणुक करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रश्नांची अद्याप सोडवणुक झालेली नाही.

महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अलीकडे एक फेब्रुवारीला माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप पुकारला होता. त्यापार्श्वूमीवर मंत्री खाडे यांनी काल मंत्रालयात बैठक आयोजित केली होती.

माजी आमदार नरेंद्र पाटील, माथाडी युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, अध्यक्ष एकनाथ जाधव, जनसंपर्क अधिकारी, पोपटराव देशमुख, संयुक्त सरचिटणीस दिलीप खोंड, सचिव कृष्णा पाटील, सुनिल यादव तसेच कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंगल, पुणे बाजार समितीचे सचिव मधुकांत गरड आदींसह उपस्थित होते.

बैठकीत विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा होवून दहा ते पंधरा दिवसात सोडवणूकीची ग्वाही मंत्र्यांनी दिली. मात्र, त्यांच्याकडून प्रश्नांची अद्याप सोडवणुक झालेली नाही. त्यामुळे नरेंद्र पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी व माथाडी कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT