Shankarrao Gadakh & Gulabrao Patil
Shankarrao Gadakh & Gulabrao Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मंत्री गडाखांनी भेंडे व घोगरगाव पाणी योजनेसाठी आणले 28 कोटी

सुनील गर्जे

नेवासे ( जि. अहमदनगर ) : नेवासे तालुक्यातील 17 गावांच्या नळ पाणी योजनेच्या दुरुस्ती व वाढीव कामासाठी निधीची अवश्यकता होती. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांनी केलेल्या पाठपुराव्याने तालुक्यातील भेंडे-कुकाणे व घोगरगावसह सतरा गावांच्या नळ पाणी योजनेच्या दुरुस्‍ती व वाढीव कामासाठी जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत 28 कोटी 46 लाखाचा निधी मिळाला आहे. या कामाला राज्याचे पाणी पुरवठा व स्वछता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. ( Minister Gadakh brought Rs 28 crore for Bhende and Ghogargaon water schemes )

नेवासे तालुक्यातील भेंडे बुद्रुक-खुर्द, कुकाणे, चिलेखनवाडी, अंतरवली, तरवडी या सहा गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 12 कोटी 4 लाखाचा तसेच  बेलपिंपळगाव, घोगरगाव, बेलपांढरी, जैनपूर, बोधेगाव, भालगाव, बोरगाव, उस्थळ खालसा, सुरेगाव गंगा, बहिरवाडी, धामोरी यासाठी 16 कोटी 42 लाखाचा कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

जलजीवन मिशनच्या मार्गदर्शक तत्वानुसार पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्ती करिता योजनेच्या किमतीच्या दहा टक्के रक्कम लोकवर्गणीच्या स्वरूपात ग्रामपंचायतीकडे ठेवणे आवश्‍यक राहील सदर रक्कम जमा करून घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषदेची राहील असे शासन निर्णयात नमूद केले आहे. पूर्वीच्या सर्व योजनांमध्ये दिवसाला प्रत्येक माणसाला 40 लिटर पाणी देण्याची तरतूद होती. आता मात्र या जल जीवन मिशन कार्यक्रम योजनेत प्रत्येक दिवसाला माणसी 55 लिटर प्रत्येकी पाणी देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

या दोन्ही योजना 1998 सालच्या असून त्या मुख्य गावसाठीच होत्या. परंतु  आता या 17 गावांसह आता वाड्या-वस्त्यांवर सुद्धा पाणी पोहचणार आहे. यात जुन्या पाण्याच्या टाक्या दुरुस्ती, गळती काढणे, वाड्या वस्त्यांवर नवीन पाईप लाइन करणे असे अनेक कामे केले जाणार आहे. 

पशुधनालाही मिळणार 'शुद्ध  पाणी'

वाड्या-वस्त्यापर्यंत पाणी पोहोचले जावे कोणीही पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू नये तसेच या योजनेत पशुधनाला शुद्ध पाणी मिळावे याचा प्राधान्याने विचार केला जावा अशी मागणी मंत्री शंकरराव गडाख यांनी केली होती, तीही मागणी मंजूर करण्यात आली आहे.

"मंत्री शंकरराव गडाख यांच्यामुळे भेंडकुकाणेसह सहा गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 12 कोटी 4 लाखाचा मोठा निधी मिळाल्याने सहा गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. मंत्री गडाख यांनी हा अतिमहत्त्वाचा प्रश्नमार्गी लावला आहे.

- लता अभंग, सरपंच, कुकाणे

"या भागात शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यावसाय मोठा आहे. पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न कायमच भेडसावत होता. मात्र मंत्री शंकरराव गडाख यांनी नागरिकांच्या पाणी प्रश्नाबरोबरच पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याने शेतकऱ्यांत समाधान आहे.

- राजेंद्र नागरे, पशुपालक शेतकरी, जैनपूर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT