Hasan Mushrif  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif : 'गोकुळ'साठी मंत्री मुश्रीफांची सर्वोच्च न्यायालयात धाव, 1200 सभासद धोक्यात? आज सुनावणी

Gokul Members Dispute : गोकुळच्या 1200 सभासदांच्या पात्रतेसंदर्भात प्रश्न निर्माण झाला आहे. कोल्हापूर सर्किट बेंचसमोर याची सुनावणी सुरू असताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

Rahul Gadkar

Kolhpur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघातील 1200 सभासदांना पात्रतेबाबत आज न्यायालयात निकाल लागणार आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या 1200 सभासदांना पात्र करण्यासंदर्भातील परिपत्रकाच्या विरोधात आजरा तालुक्यातील महादेव दूध संस्थेचे प्रकाश बेलवडे यांनी याचिक दाखल केली होती. या याचिकेविरोधात हसन मुश्रीफ यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.

दरम्यान, मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी मंगळवारी पार पडली. यावेळी याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी या 1200 संस्थांना वगळून गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करा, अशी मागणी केली. त्या संदर्भात स्थगिती देण्यात आलेल्या संस्थांच्या कागदपत्राच्या पूर्ततेसाठी 17 मार्चपर्यंत मुदत मागून घेतली आहे.

कोल्हापूर 'सर्किट बेंच'मध्ये गोकुळच्या या 1200 सभासदांना संदर्भात सुनावणी सुरू असताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आज नेमका काय निर्णय होणार याकडे गोकूळमधील सभासदांचे लक्ष लागले आहे.

याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले की, 'माझी लढाई या 1200 सभासदांच्या विरोधात नाही. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तत्कालीन दुग्धविकास मंत्री विखे पाटील यांची दिशाभूल करून दाखल केलेल्या पत्राच्या विरोधात आहे. कायदेशीररित्या जे सभासद पात्र आहेत त्यांनी कागदपत्राची पूर्तता करावी. कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये वकिलामार्फत तारीख मागून घ्यायची आणि मागच्या दारातून सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढायची हीच मंत्री मुश्रीफ यांची बेनामी भूमिका आहे.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT