Shambhuraj Desai Yashwantdatta Bendre, tarale
पश्चिम महाराष्ट्र

Patan News: मंत्री शंभूराज देसाईंची तत्परता; ५५ प्रवाशी सुखरूप घरी परतले....

Shambhuraj Desai मंत्री देसाईंच्या कार्यतत्परतेने सर्वजण भारावले. आपल्याच कुटुंबातील एका सदस्यप्रमाणे काळजी घेऊन केलेली मदत तालुकाभर चर्चेचा विषय झाली आहे.

सरकारनामा ब्युरो

Tarale News : मंत्री शंभूराज देसाईंचे साधेपणाचे व कार्य तत्परतेचे अनेक किस्से सर्वपरिचित आहेत. अशाच एका घटनेने पुन्हा त्याला उजाळा मिळाला आहे. रायगड-महाड रस्त्यावर बंद पडलेल्या खासगी बसमध्ये आंबळे (ता.पाटण) गावातील सहलीला गेलेले सरपंच, उपसरपंच ग्रामस्थ व मुले असे ५५ जण अडकले होते. रात्रीची वेळ सुनसान रस्ता विनवण्या करूनही मॅकेनिक येईना. अशात मंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai धावून आले आणि सर्व प्रवाशी सुखरूप आंबळे मुक्कामी पोहोचले.

त्याचे झालं असं की आंबळे (ता.पाटण) येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ यांनी आयोजित केलेल्या सहलीसाठी ५५ जण मिळून रविवारी पहाटे रायगडला रवाना झाले. दिवसभर रायगड बघून सायंकाळी सहा वाजता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. काही अंतर पुढे जाताच रायगड- महाड दरम्यान, गाडीची क्लचप्लेट खराब झाली. त्यामुळे गाडी जागेवरून हलेना. ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच यांनी जवळपास मॅकॅनिक पाहिला. विनवणी करूनही कोणी येईना.

अंधार पडून रात्रीचे साडे सात वाजले. त्यामुळे सुनसान रस्त्यावर सर्वांची घाबरगुंडी उडाली. गाडीतील आंबळेचे सरपंच रोहित खरात, अमोघ घाडगे, सूर्यकांत कदम, राजू मोरे जयसिंग शिंदे,सदाशिव शिंदे प्रथमेश सपकाळ आदींनी प्रसंगावधान राखत तात्काळ पालकमंत्री शंभूराज देसाईंना ही गोष्ट कळविली. अन् क्षणात तिथूनच देसाई साहेबांनी सूत्रे हालवली.

तात्काळ मदत यंत्रणा कामाला लावली. स्थानिक आमदार भरत गोगावले यांना फोन करून त्यांच्या सहकार्याने सर्व रायगड प्रशासकीय यंत्रणेला फोन लावून तातडीने मदती करण्याची सूचना मंत्री देसाई यांनी केली. महाड तालुका पोलिस यंत्रणेसह,सर्व प्रशासन यंत्रणेने मदतीसाठी तत्परता दाखवली. सर्वजण घटनास्थळी दाखल झाले होऊन. विचारपूस करुन तात्काळ दुसऱ्या ट्रॅव्हलची व्यवस्था केली.

तसेच सहलीतील ५५ जणांसह सर्वांना चहा, नाश्ता, जेवण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. सहलीतील सर्वांना सुखरुप दुसऱ्या बसने आंबळे या ठिकाणी पोचवण्याची व्यवस्था केली. अन् सर्व जण सुखरूप घरी परतले. सुमारे अडीचशे किलोमीटर दूर पर जिल्ह्यात आपल्या माणसाने घेतलेली दखल लाजवाब आहे. मंत्री देसाईंच्या कार्यतत्परतेने सर्वजण भारावले. आपल्याच कुटुंबातील एका सदस्यप्रमाणे काळजी घेऊन केलेली मदत तालुकाभर चर्चेचा विषय झाली आहे. ५५ जणांनी देसाई साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT