Babanrao Shinde, Sanjay Patil Ghatnekar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Politics : बबनराव शिंदेंनी 'सीना माढा'चं पाणी पळवण्याचं महापाप केलं; संजय पाटील घाटणेकरांचा आरोप

Babanrao Shinde Vs Sanjay Ghatnekar : निमगावच्या तळ्यात नोंद नसतानाही पाणी सोडले जातेय

Harshal Bagal

हर्षल बागल

Solapur Political News : सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या झळांनी होरपळत आहे. यातच दुष्काळी सवलतीतून जिल्ह्यातील काही तालुक्यांतील गरजवंत शेतकऱ्यांना वगळण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. दुष्काळावरून जिल्ह्यात राजकारण पेटले असताना शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी पाणीवाटपावरून आमदार बबनराव शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Latest Political News)

'सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आवर्तन सुरू असताना पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत आमदार शिंदेंच्या निमगाव येथील तळ्यामध्ये पाणी सोडू नये. अहवालामध्ये तळ्यात पाणी सोडण्याची कुठेही नोंद नाही. असे असतानाही तळ्यामध्ये पाणी सोडण्याचे काम कोण करतेय ?' असा प्रश्न उपस्थित करत शेतकरी संघटनेचे नेते संजय पाटील घाटणेकरांनी आमदार बबनराव शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

घाटणेकर म्हणाले, 'तळ्यात पाणी सोडण्याची नोंद नसतानाही पाणी सोडणे म्हणजे पाणी चोरण्याचाच प्रकार आहे. हे पाणी चोरले जातेय आणि ते महापाप आमदार शिंदे करत आहेत,' असा धक्कादायक आरोप संजय पाटील घाटणेकरांनी केला आहे. तसेच निमगावच्या तळ्यात पाणी सोडण्याच्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीही घाटणेकरांनी केली आहे. ऐन दुष्काळात घाटणेकरांनी आमदार शिंदेंवर केलेल्या या आरोपांनी माढा तालुक्यातील राजकारण तापणार असल्याचे बोलले जात आहे. (Maharashtra Political News)

या वेळी घाटणेकरांनी प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले. ते म्हणाले, 'सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या शेवटचे बैरागवाडी, माढा, परिसरातील सर्व गावे, वेताळवाडी रणदिवेवाडी, अरण, वरवडे, परिते घाटणे, सापटणे या सर्व गावांना पाण्याचा लाभ सर्वप्रथम मिळाला पाहिजे. या सर्व गावांना म्हणजेच योजनेच्या टेलपर्यंत पाणी पोहोचत नाही, तोपर्यंत निमगावच्या तळ्यामध्ये पाणी सोडू नये. मात्र, असे प्रकार घडताना दिसत आहेत. आता निमगावच्या तळ्यात मधूनच पाणी सोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही या चौकशीची मागणी करणार आहोत,' असा इशाराही घाटणेकरांनी अधीक्षक अभियंता धीरज साळे यांना या वेळी दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT