Aditya Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा विधानसभाध्यक्षांवर थेट 'सेटलमेंट'चा आरोप; नेमकं काय म्हणाले ?

Rahul Narwekar : शिंदे विरुद्ध ठाकरे गट वाद चिघळणार

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल बुधवारी (ता. १० जानेवारी) येणार आहे. मात्र त्यापूर्वीच विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांनी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावर ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी नार्वेकरांवर सेटलमेंटचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या आदित्य यांनी नार्वेकरांसह भाजपवर सडकून टीका केली. राज्यात सध्या सत्येमेव जयते नाही तर सत्तामेव जयते सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकरांवर सुरू ईडीच्या धाडसत्रावर आदित्य म्हणाले, एनडीएतील घटकपक्षांना सूट आणि विरोधकांवर धाडी असा प्रकार सध्या सुरू आहे. देशात केवळ आणि केवळ सत्तामेव जयते सुरू आहे. त्यासाठीच विरोधकांमागे ईडीची पीडा लावली जाते, असाही आरोप ठाकरेंनी केला.

दरम्यान, निकालापूर्वी नार्वेकरांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीवर सडेतोड भाष्य केले. ते म्हणाले, आमदार अपात्रतेचा निकाल उद्या येणार आहे. हा निकाल विधानसभाध्यक्ष एक लवाद म्हणून देणार आहेत. लवादाने कुणाचीही बाजू न घेता निष्पक्षपणे निकाल देणे अपेक्षित आहे. मात्र अध्यक्ष स्वतःच घटनाबाह्य मुख्यमंत्री असलेल्या शिंदेंच्या भेटीला गेले होते. म्हणजे न्यायमूर्ती आरोपींच्या भेटीला गेले, असाच अर्थ होतो. वर्षा बंगल्यावर सेटलमेंट करायला न्यायाधीशाच्या भूमिकेतील अध्यक्ष कसे काय जाऊ शकतात?,' असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'एबी फॉर्म कुणी दिला हे माहिती नाही, असे सांगताना शिंदे गटातील आमदारांनी लाज सोडली होती. त्यांना फक्त सत्ता हवी होती. सत्तेसाठीच त्यांनी शिवसेना फोडली. आता निकाल देताना अध्यक्ष स्वतःची बदनामी करून घेतील की राज्याच्या हिताचा निकाल देतील, हे पाहावे लागेल,' असे मतही आदित्य ठाकरेंनी व्यक्त केले.

'अध्यक्षांनी दीड वर्ष खेचले. उशीर करणे हेच न्याय नाकारण्यासारखे असते. हा प्रश्न फक्त आमच्यापुरता नाही, तर या निकालाकडे जगाचे लक्ष आहे. जगात भारत सर्वात मोठी लोकशाही म्हणून मिरवत आहे. आता देशातच लोकशाही टिकणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाकडे जगाचे लक्ष आहे. हा निकाल देताना स्वतःचे नाव खराब करून घेणार नाहीत,' अशी अपेक्षाही (Aditya Thackeray) आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली.

आदित्य ठाकरेंनी भाजपच्या हेतूवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, दोन पक्ष, एक कुटुंब फोडून भाजपने काय मिळवले. राज्यातील मोठे उद्योग गुजरातला गेले. वर्ल्ड कपचा अंतिम सामना गुजरातमध्ये झाला. तलाठी परीक्षेत भ्रष्टाचार झाला. ४० आमदारांना बाद करून आनंद साजरा करायचा आणि दुसरे आमदार बाद करण्याची रणनीती आखायची, हाच भाजपचा डाव असल्याचा घणाघात आदित्य यांनी केला.

(Edited by Sunil Dhumal)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT