Mumbai News : जो शेड्यूल-10 आम्हाला ॲप्लिकेबलच नाही. त्यावर आम्ही कशाला चर्चा करायची. पक्षांतरबंदी कायदा आम्हाला लागूच होत नाही. आम्ही पक्ष बदललेला नाही. आम्ही दुसऱ्या गटात गेलेलो नाही. आम्ही इतर कुठच्याही पक्षात गेलेलो नाही. आम्ही आमचा स्वतंत्र गट केलेला नाही. आम्ही आजही शिवसेनाच आहोत, त्यामुळे पक्षांतरबंदी कायद्यानुसार आमच्यावर कारवाई होणारच नाही, असा दावा शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी केला. (Shiv Sena Shinde group MLAs will not be disqualified: Sanjay Shirsat)
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर उद्या (ता. 10 जानेवारी) विधानसभाध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार शिरसाट यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले की, ठाकरे गटाचा सर्व आक्षेप व्हीपवर आहे. व्हीपवर त्यांची एकवाक्यता नाही. एकीकडे ते म्हणतात, की आम्ही व्हीप बजावला आणि दुसरीकडे म्हणतात, की आमच्या कर्मचाऱ्यांनी बजावला असेल. त्याचे आऊटवर्ड नंबरही वेगवेगळे आहेत. मग सांगायचं की, आम्ही तीन मंत्र्यांसमोर ठराव घेतले होते. शपथपत्रावर म्हणतात की, ते मंत्री उपस्थितच नव्हते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ठाकरे गटाचा बेसिक गोंधळ झालेला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात निकाल जाण्याची दाट शक्यता त्यांना वाटत आहे. त्यामुळे ते बिथरलेले आहेत. त्याच अवस्थेत ते बोलत आहेत. म्हणून आम्हाला काळजी नाही. हा निकाल देशाच्या इतिहासात वेगळी दिशा देणारा ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
आमच्या मनात कोणतीही धाकधूक नाही. आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच उठाव केला आहे. उलट ठाकरे गटाची धाकधूक वाढली आहे. निकाल काय लागणार आहे, यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधानसभाध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर भेटलेच कसे? यावर त्यांची चर्चा सुरू झाली आहे. सुनावणीच्या पहिल्या दिवसापासून ते आमच्याविरोधात निकाल जाणार, आमचा अध्यक्षांवर विश्वास नाही, आम्हाला सुप्रीम कोर्टात जावे लागणार आहे, असं सांगत आहेत. ते सर्व पहिल्यापासून चुकत आले आहेत, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.
आमदार संजय शिरसाट म्हणाले की, आमदार अपात्रता निकाल आणि मुख्यमंत्री-विधानसभा अध्यक्षांच्या भेटीचा परस्पर काहीही संबंध नाही. एखाद्याची वैयक्तिक भेट तुम्ही या प्रकरणावर कशी काय नेता. मुख्यमंत्री कधीही विधानसभाध्यक्षांना आपल्या दालनात बोलावत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पण ती कामकाजाच्या ठिकाणी असते. पण वैयक्तिक काम असेल तर ते भेटू शकतात. त्यांनी काय कायम अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेतच राहावं का. आम्ही जेव्हा त्यांना भेटतो, नार्वेकर नावांनी बोलतो. पण, ते अध्यक्ष म्हणून येतात, तेव्हा त्यांना माननीय अध्यक्षमहोदयच म्हणावं लागतं.
देशासाठी महत्त्वाचा निकाल
निकाल कोणाच्याही बाजूने लागो. विरोधात निकाल लागलेली पक्ष सुप्रीम कोर्टात जाणारच आहे. त्यावरच सर्व युक्तिवाद होणार आहे, त्यामुळे बुद्धी शाबूत ठेवून अत्यंत संयमाने आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा निकाल द्यावा लागणार आहे. कोणी स्वतःच्या करिअरवर डाग लावून घेणार नाही, त्यामुळे हा निकाल देशासाठी महत्त्वाचा आहे. तो महाराष्ट्र विधानसभाध्यक्षांना द्यायचा आहे.
Edited By : Vijay Dudhale
R...
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.