MLA Jaykumar Gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमदार गोरेंना धावाधाव करावी लागणार : अटकपूर्व जामीन फेटाळला..

सरकारनामा ब्युरो

सातारा : मायणी येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात भाजपचे माण, खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी वडुज येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने आज त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आमदार गोरेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

मायणी येथील मृत भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (रा. विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (रा. बिदाल, ता. माण) व अज्ञात दोघांवर दहिवडी पोलिस ठाण्‍यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी तक्रार दिली आहे.

यापूर्वी या गुन्ह्यामध्ये संजय काटकर याला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. दोन दिवसांपूर्वी अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली. यावर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने याबाबतचा निकाल आज शुक्रवारी देणार असल्याचे सांगितले होते. याबाबत फिर्यादीच्या बाजूने सरकारी वकील मिलिंद ओक यांनी बाजू मांडली होती.

वडुजचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.व्ही. हुद्दार यांनी सरकारी पक्ष व बचाव पक्षाची बाजू ऐकूण यावर सुनावणी झाली. यामध्ये जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज वडूज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आमदार गोरे यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT