MLA Praniti Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या कारवर भाजप समर्थकांकडून हल्ला? सरकोली गावात...

Solapur Lok Sabha Election 2024 :आपल्या गाडीवर भाजप समर्थक लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

Mangesh Mahale

Solapur Political News : लोकसभेसाठी काँग्रेसने आठ राज्यांतील ५७ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांवरील उमेदवारांच्या नावांच्या घोषणा करण्यात आली आहे.

सोलापूर लोकसभेसाठी (Solapur Lok Sabha Election) आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. माझ्या गाडीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे. गुरुवारी रात्री हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले.

काही दिवसांपासून प्रणिती शिंदे या सोलापूर जिल्ह्यात मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्या पंढरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या राज्यभरात लोकप्रतिनिधींना गाव बंद आंदोलन सुरू आहे. गाव बंदी असताना गावात येणाऱ्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचे काम सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गुरुवारी दुपारी पंढरपूर (Pandharpur) तालुक्यात आल्यानंतर त्यांना मराठा समाजाकडून जाब विचारण्यात आला. त्यानंतर त्यांनी भाजपच्या नेत्यांनाही गाव बंदी करावी, अशी मागणी केली होती. त्या सरकोलीतून सोलापूरकडे येत असताना त्यांची गाडी अडवण्यात आली. त्यावेळी आपल्या गाडीवर भाजप समर्थक लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

"ते मराठा आंदोलक नव्हते मराठा आंदोलकाच्या नावाने भाजपचे लोक मराठा समाजाचे आरक्षणाचे आंदोलन बदनाम करीत आहेत," असेही प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे. मराठा समाजाने पुकारलेल्या गावाबंदीला प्रणिती शिंदेंनी समर्थन दिले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

सोलापूर लोकसभेसाठी प्रणिती शिंदे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर महायुतीकडून कोण उमेदवार असणार, याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम सातपुते या तरूण चेहऱ्याला भाजप (BJP) सोलापूर लोकसभेसाठी मैदानात उतरविणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदारांविरुद्ध आमदार असा सामना सोलापूर लोकसभा मतदारसंघात रंगणार असल्याचे चित्र आहे. अभ्यासू, आक्रमक, तरूण चेहरा म्हणून आमदार सातपुतेंची ओळख आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT