Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमदार राजेंद्र राऊतांच्या मुलांचा जीव धोक्यात : फडणवीसांचा गंभीर आरोप

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी सोलापूर जिल्ह्यातील अवैध धंद्याबाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांना सोलापूर जिल्हा पोलिसांकडून टार्गेट केले जात आहे. तुमच्यावर गुन्हा दाखल करणार, तुमच्या मुलाला फसवणार असे सांगितले जात आहे. आजही त्यांच्या मुलाचा जीव धोक्यात आहे. अपक्ष निवडून आल्यानंतरही ते आमच्याबरेाबर आहेत; म्हणून त्यांच्यावर डूख धरला जात आहे, असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी (ता. २४ मार्च) केला. (MLA Rajendra Raut's son's life in danger : Fadnavis' serious allegations)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते फडणवीस हे विधानसभेत बोलत होते. ते म्हणाले की, सोलापूरमध्ये एक सचिन वाझे आहे. हा क्राईम ब्रांचसाठी ६० लाख गोळा करतो. त्याचं स्टिंग ऑपरेशन झालेले आहे. योगेश पवार यांनी ही क्लिप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पाठवली आहे. मी गृहमंत्र्यांना ओळखतो, त्याच्याकडे हे पैसे गेले नसतील. त्याबाबतची तक्रार लाचलुचपत विभागाकडे (अँटी करप्शन) करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांनी चौकशी करण्याची घोषणाही केली आहे. त्याबाबत पुढे काहीही झालेले नाही.

विधानसभेच्या सभागृहात बोलल्यावर प्रशासन डूख धरणार असेल तर योग्य नाही. बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी सोलापूर जिल्ह्यातील अवैध धंद्याबाबतचा विषय मांडला होता. त्यानंतर सोलापूर बैठक झाली. गृहराज्यमंत्री तेथील एका बैठकीला उपस्थित होते. त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावे की, त्या बैठकीला कोण कोण उपस्थित होते. आमदार राऊत यांना टार्गेट केलं जातंय. तुमच्यावर गुन्हा दाखल करणार. तुमच्या मुलाला फसवणार असे त्यांना सांगितले जात आहे, असा गंभीर आरोपही फडणवीस यांनी या वेळी बोलताना केला.

माजी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मी मागच्या वेळी तक्रार केलेली आहे. पण संबंधितांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. अवैध धंद्यावर सभागृहात बोलल्यामुळे त्यांच्यावर डूख धरला जाणार असेल तर ते काही योग्य नाही. पण अपक्ष निवडून आल्यानंतही ते आमच्यासोबत आहेत, म्हणूनच त्यांना त्रास दिला जात आहे. त्यांना पोलिसांचेही संरक्षण नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT