Ram Shinde Appoint in Jharkhand :  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ram Shinde News : राम शिंदे जाणार थेट झारखंडला; भाजपने सोपवली मोठी जबाबदारी!

Ram Shinde Appoint in Jharkhand : मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण...

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वात भाजप सरकारला (BJP) सलग ९ वर्षे पुर्ण झाली. याचंच निमित्त साधून भारतीय जनता पार्टीच्याकडून 30 मे ते 30 जून 2023 दरम्यान एक विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले असून, या अंतर्गत संपूर्ण देशात विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

यासाठी निवडक पदाधिकार्‍यांची टिम तयार करुन विविध प्रदेशात मोदी सरकारच्या योजनांचे अंमलबजावणी व पुढील ध्येय धोरणे याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी नेमण्यात आली आहे. या अभियानाअंतर्गत महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व आमदार राम शिंदे यांची झारखंडचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तसे पत्र भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री तरुण चुग यांनी दिले आहे. यामुळे आता राम शिंदे लवकरच झारखंडला दाखल होणार असल्याची माहिती आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा व महामंत्री बी.एल.संतोष यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकी चार लोकसभा मतदार संघासाठी ही टिम तयार करण्यात आली आहे. यामध्ये प्रभारी व सहप्रभारी नियुक्त झालेले पदाधिकारी संबंधित लोकसभा क्षेत्रात जाऊन तेथील केंद्र सरकारच्या योजनांची होत असलेली अंमलबजावणी, योजनांचा लाभ मिळालेल्यांच्या प्रतिक्रिया, भाजपा पक्षाची तेथील स्थितीबाबत खासदार, आमदार, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून आढावा घेणार आहेत. 

या महत्वाच्या अभियानात राम शिंदे यांचे निवड होणे ही त्यांच्या कार्यकर्तुत्वाची ओळख असल्याचे सांगत शिंदे यांना राष्ट्रीय राजकारणात सातत्याने स्थान देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. यापुर्वीही त्यांच्यावर गोवा, कर्नाटक (Karnataka) राज्यातील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती. पक्षांतर्गत राम शिंदे यांचे महत्व वाढत असल्याने त्यांच्यावर केंद्रीय पातळीवर वेगवेगळ्या जबाबदार्‍या देण्यात येत आहे, असे भाजप जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी म्हंटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT