Narayan Patil-Babasaheb Deshmukh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jaykumar Gore Politics : जयकुमार गोरेंची सोलापुरात मोठी खेळी : माेहिते पाटील समर्थक राष्ट्रवादीच्या आमदाराला लावले गळाला

Solapur Vidhan Parishad Election 2026 : राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीवेळी जयकुमार गोरे यांनी बेरजेचे राजकारण करत विविध पक्षांतील नेत्यांना एकत्र आणल्याची चर्चा सोलापुरात रंगली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 01 June : सोलापुरातून भारतीय जनता पक्षाने बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली आहे. राऊत यांना उमेदवारी देतानाच भाजपने विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बेरजेचे राजकारण केल्याचे दिसून आले.

आठवडाभरापूर्वीच बिनविरोध निवडणुकीचे आवाहन करणाऱ्या गोरेंनी बेरजेचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहिते पाटील समर्थक आमदाराबरोबरच शेकाप आमदारालाही गळाला लावल्याचे दिसून आले. या दोन्ही आमदारांनी राऊत यांचा अर्ज भरण्यासाठी हजेरी लावली होती.

विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये (BJP) इच्छुकांची मोठी संख्या होती. त्यात माजी आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, राम सातपुते, राजन पाटील, रोहन देशमुख आदींचा समावेश होता. या सर्वांवर राजेंद्र राऊत यांनी मात करून उमेदवारी मिळवली आहे.

राजेंद्र राऊत हे तब्बल चार ते पाच दिवस मुंबईत तळ ठोकून होते. उमेदवारी निश्चितीनंतरच ते मुंबईतून सोलापूरला पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या सोबत एकाच विमानातून आले होते, हे स्पष्ट झाले आहे. याशिवाय, राऊत यांनी शनिवारीच उमेदवारी अर्ज घेतला होता, त्यामुळे राऊत यांना उमेदवारी मिळणार हे स्पष्ट झाले होते.

दरम्यान, राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पालकमंत्री गोरे यांच्यासह आमदार विजकुमार देशमुख, शिवसेना खासदार ज्योती वाघमारे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, देवेंद्र कोठे, माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, राम सातपुते, शहाजीबापू पाटील, संजयमामा शिंदे, दीपक साळुंखे हे भाजप-शिवसेनेचे आजी-माजी आमदार उपस्थित होते.

शिवसेना-भाजपसोबत शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील हेही राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज भरायला उपस्थित होते. या दोघांच्या उपस्थितीमुळे सर्वांना आश्यर्चाचा धक्का बसला. कारण, नारायण पाटील हे मोहिते पाटील समर्थक म्हणून आळखले जातात. त्यांच्या उपस्थितीची जिल्हाधिकारी कार्यालयात एकच चर्चा रंगली होती.

सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती भाजपच्या विरोधात लढवली होती. त्यानंतरही त्यांनी यश मिळविले होते. मात्र, पंचायत समितीत शेकापसोबत युती केलेले दीपक साळुंखे यांनी सभापती निवडीवेळी भाजपसोबत गेले होते, त्यामुळे शेकापची पंचायत समिती हातची गेली होती, त्यामुळे देशमुख यांच्या भाजपच्या जवळ जाण्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

पालकमंत्री गोरेंचे बेरजेचे राजकारण

दुसरीकडे, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषद निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन जिल्ह्यातील नेत्यांना केले आहे. त्यासाठी आपण कोणाशीही चर्चा करायला तयार आहे. पण सोलापूरने बिनविरोध करून इतिहास घडवावा, असे आवाहन केले होते. मात्र, त्यापूर्वीच गोरे यांनी बेरजेचे राजकारण करत शेकाप आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार गळाला लावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT