Prashant Paricharak : प्रशांतमालक एकदा भूमिका घ्याच : विधान परिषदेला डावलल्याने परिचारक समर्थक आक्रमक

Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषद उमेदवारीतून डावलल्यानंतर प्रशांत परिचारक यांच्या समर्थकांमध्ये नाराजी वाढली असून त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे पंढरपूर-मंगळवेढ्याचे लक्ष लागले आहे.
Prashant Paricharak
Prashant Paricharak Sarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha, 01 June : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाचा आमदार करण्यासाठी विधानसभेच्या दोन निवडणुकांमध्ये त्याग करूनही विधान परिषद निवडणुकीतून माजी आमदार प्रशांत परिचारक यांना डावलण्यात आल्याने समर्थकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.‘प्रशांतमालक एकदा भूमिका घ्याच’ अशी आग्रहाची भूमिका काहींनी मांडली आहे, त्यामुळे तिकिट वाटपात डावलण्यात आलेले प्रशांत परिचारक यांच्या भूमिकेकडे पंढरपूर-मंगळवेढ्याचे लक्ष लागले आहे.

विधानसभेच्या 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत पंढरपुरात तिरंगी लढत झाल्यामुळे (स्व.) आमदार भारत भालके हे विजयी झाले आहेत. मात्र, भारत भालके यांच्या 2020 मधील अकाली मृत्युमुळे 2021 मध्ये झालेल्या पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांच्यात समेट घडवून आणली. त्या वेळी मतदारसंघातील मराठा समाजाचे प्राबल्य पाहून समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली.

महाविकास आघाडीने ताकद लावूनही माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी त्या निवडणुकीत पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातून अपेक्षित मताधिक्य दिल्यामुळे समाधान आवताडे यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला. मात्र, विजयानंतर समर्थकांचे आणि पंढरपूर तालुक्यातील प्रश्नांना वाचा फुटू शकली नाही.

त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी परिचारक समर्थकांनी ‘मालकांनी विधानसभा लढवावी’ असा आग्रह धरला. त्यावेळी प्रशांत परिचारक यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत ‘मी माझ्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. तसेच, कुणाच्या दावणीला बांधणारही नाही,’ अशी देखील भूमिका घेत विधानसभा लढविण्याचे संकेत दिले होते

Prashant Paricharak
Prashant Paricharak : राजेंद्र राऊतांचा अर्ज भरायला प्रशांत परिचारकांची दांडी; उमेदवारी डावल्याने नाराजीच्या चर्चेला उधाण

प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंढरपूर येथे येऊन प्रशांत परिचारक यांची भेट घेतली होती. त्या वेळी परिचारक हे विधीमंडळात दिसतील, असे बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितल होते, त्यामुळे परिचारक यांनी माघार घेत समाधान आवताडे यांच्यासाठी प्रचार केला. त्यानुसार 2024 च्या विधानसभा निवडणुकीतही भाजप उमेदवार आवताडे यांचा विजय झाला.

विधानसभा 2024 च्या निवडणुकीनंतर राज्यपाल नियुक्त कोट्यातून प्रशांत परिचारक यांना संधी मिळेल, अशी शक्यता असताना त्यावेळी परिचारकांना डावलले गेले. दुसऱ्या बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सोलापुरातून परिचारक हे प्रबळ दावेदार मानले जात होते. कारण 2016 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत अपेक्षित मतदार नसतानाही परिचारकांनी राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक साळुंखे यांचा पराभव केला होता. त्यामुळे त्यांच्या नावाची रविवारी रात्रीपर्यंत चर्चा होती. मात्र, रविवारी साडेदहाच्या सुमारास माजी आमदार राजेंद्र राऊत यांना संधी दिली आहे.

Prashant Paricharak
Satej Patil : 'महाडिक साहेबांची सत्ता होती, तेंव्हा हस्तक्षेप होतं नव्हता', सतेज पाटलांनी अखेर 'तो' क्षण सांगितला

विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी डावलण्यात आल्याने प्रशांत परिचारक समर्थकांनी उघडपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. पंढरपूर, माढा, मोहोळ, सांगोला या चार तालुक्यांचे आमदार ठरविणाऱ्या नेत्याला विधान परिषद मिळत नसेल तर आता योग्य विचार करण्याची वेळ आली आहे. आपला नेता वरचढ होईल, या भीतीने त्यांचा गेम केला, अशा भावनाही समर्थकांनी सोशल मीडियातून व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com