raj thackeray, uddhav thackeray And harshwardhan sapkal sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJP Politics : सातारा सांगलीत मनसे, काँग्रेस, उबाठाला खिंडार!, भाजपमध्ये नेत्यांचा प्रवेश, बावनकुळेंची घणाघाती टीका

Political Crisis In MNS, Congress And Shivsena UBT : आगामी स्थानिक स्वराज संस्थांनच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊट गोईंग जोरदार सुरू झाले आहे.

Aslam Shanedivan

Sangli / Satara News : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज संस्थांनच्या निवडणुकांच्या घोषणा कधीही होण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या असून राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आहे. महायुतीचे सरकार आल्याने सध्या भाजप सह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिवसेना राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होताना दिसत आहेत. मंगळवारीही (ता.8) भाजपमध्ये मुंबईत सांगली साताऱ्यातील काही नेत्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यामुळे मनसे, काँग्रेस, उबाठाला खिंडार पडल्याची सध्या चर्चा सुरू आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी अनेकजण भाजपमध्ये येण्यास उत्सुक दिसत आहेत. यामध्ये आता सांगलीसह साताऱ्यातील काही चेहऱ्यांचा समावेश आहे. आ. अतुलबाबा भोसले यांच्या पुढाकाराने साताऱ्यात भाजपने काँग्रेसला खिंडार पाडले आहे.

येथे कराड तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मलकापूर नगरपालिकेचे शिक्षण व नियोजन सभापती तसेच माजी बांधकाम सभापती शंकरराव चांदे, मलकापूर शहर अध्यक्ष तसेच माजी नियोजन व शिक्षण सभापती प्रशांत चांदे, सतीश चांदे, मलकापूर शहर रोटरी क्लब अध्यक्ष धनाजी देसाई यांच्यासह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस संदीप गिड्डे संदीप गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा मनसे उपाध्यक्ष धनंजय शिंदे, मनसे कवठे महांकाळ तालुका अध्यक्ष कुमार जाधव, हणमंत शिंदे, सचिन गायकवाड, आकाश तेली, आकाश सावडकर, उबाठा चे मनोज चव्हाण, प्रहार शेतकरी संघटना सांगली जिल्हा उपाध्यक्ष रणजीत माने, जितेंद्र माने यांसह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी बावनकुळे यांनी काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमुळे महाराष्ट्राच्या विकासात बाधा येत असल्याची घणाघाती टीका केली. तसेच भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांनी सक्रीय सदस्य होऊन पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी झोकून देऊन काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी क्रिकेटचे मैदान गाजववलेल्या भारताचा दिग्गज आणि मराठमोळा क्रिकेटपटू केदार जाधव याने देखील भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच्या या राजकीय आखाड्यातील नव्या प्रवेशाची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याने प्रभावित होऊन आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे केदार जाधव यांने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर भाजपासाठी केदार यांचा पक्षप्रवेश हा आनंदाचा क्षण असून त्यांच्याकडील सांघिक भावना, कौशल्य पक्षाला ताकद मिळेल असा आशावाद बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

या पक्षप्रवेशाला ओबीसी कल्याण, दुग्धविकास मंत्री अतुल सावे, खा. अशोक चव्हाण, आ. अतुलबाबा भोसले, आ. समाधान आवताडे, भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT