BJP Politics: पंतप्रधान मोदींची ‘सौगात’ मालेगावकरांवर रूसली! काँग्रेस नेते म्हणतात,योजनाच फसवी होती.

PM Narendra Modi;Ramadan Eid has come but the Prime Minister's blessings have not reached the Muslims-भाजप मालेगावकरांवर रुसला की लोकसभा निवडणुकीतील मतदानामुळे संतापला?
Saugat E Modi Gift Kit
Saugat E Modi Gift KitSarkarnama
Published on
Updated on

BJP News: यंदाच्या रमजान ईद साठी पंतप्रधान मोदी यांनी "सौगात ए मोदी"उपक्रमाची घोषणा केली होती. यामध्ये भाजप तर्फे मुस्लिम बांधवांना मिठाई आणि कपडे असलेले पाकिटे वाटण्यात येणार होती. या योजनेची देशभर मोठ्या प्रमाणावर राजकीय चर्चा झाली.

आता रमजान ईद झाली आहे. मालेगाव शहर हे मशिदींचे शहर मानले जाते. येथे मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्यांक समाजाचे वास्तव्य आहे. मात्र यातील एकाही मशिदीत अथवा नागरिकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "सौगात-ए-मोदी" मिळाल्याच नाही. त्यामुळे तो चर्चेचा विषय आहे.

Saugat E Modi Gift Kit
Girish Mahajan Politics: एकनाथ खडसेंचा आरोप भाजपच्या जिव्हारी, रावेरला महाजन समर्थक संतापले!

या संदर्भात काँग्रेसचे शहराध्यक्ष एजाज बेग यांनी पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतर आम्हालाही आश्चर्य वाटले होते. मात्र सरकारच्या बहुतांशी योजना फसव्या असतात याचा अनुभव आता आम्हाला आलेला आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा आशीर्वाद अल्पसंख्याकांना मिळणे हे मोठे अप्रूप वाटण्याजोगे होते. प्रत्यक्षात तसे काहीही घडले नाही. त्याचे फारसे आश्चर्यही वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

Saugat E Modi Gift Kit
Girish Mahajan Politics: एकनाथ खडसेंचा आरोप भाजपच्या जिव्हारी, रावेरला महाजन समर्थक संतापले!

पंतप्रधान मोदी यांनी ही घोषणा केली. त्यावर मोठ्या प्रमाणावर राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या. समाज माध्यमांवर याबाबत कौतुक आणि टीका अशा संमिश्र प्रतिक्रिया होत्या. अनेक राजकीय नेत्यांनी विविध भाजप विरोधकांना सध्याच्या वातावरणात हा धक्काच होता.

मात्र आता रमजान ईदचा उत्साह आणि आनंद दोन्हीही मावळले आहेत. रमजान ईद संपली. मात्र "सौगात-ए- मोदी" अर्थात उर्दू भाषेत त्याचा अर्थ मोदींचा आशीर्वाद असा होतो. तो कोणालाच मिळाला नाही याची चर्चा सुरू आहे.

याला भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. ही योजना राष्ट्रीय स्तरावर घोषित झाली होती. पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या क्षमतेप्रमाणे निधी संकलित करून मशिदीत समाज बांधवांना त्याचे वाटप करणे अपेक्षित होते. त्यात अल्पसंख्यांक विभाग तोकडा पडला. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह मालेगाव शहरात त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही असे, भाजपच्या नेत्यांनी सांगितले.

भाजप विरोधकांवर अल्पसंख्याकांचा अनुनय केला जातो, असा आरोप सातत्याने भाजप करीत आली आहे. हिंदुत्वाचे राजकारण करताना काँग्रेस पक्ष त्यांचे मुख्य टार्गेट असतो. त्यामुळे भाजप यंदा स्वतःच अल्पसंख्याकांचे राजकारण करून त्यांना राजकीय धक्का देण्याच्या तयारीत होता. असा अनेकांचा समज झाला. प्रत्यक्षात मात्र भाजपची ही घोषणा हवेतच विरली अशी स्थिती आहे.

--------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com