raju patil News, MNS News, Sambhaji Raje chhatrapati News in Marathi
raju patil News, MNS News, Sambhaji Raje chhatrapati News in Marathi sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मनसे आमदाराने घेतली खासदार संभाजीराजेंची बाजू : ट्विट करत म्हंटले की...

सरकारनामा ब्युरो

डोंबिवली - राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहाव्या जागेसाठी शिवसेनेने खासदार संभाजीराजे यांना डावलले. मात्र संभाजीराजे यांच्या मागे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहिली आहे. मनसेच्या आमदाराने संभाजीराजे यांच्या बाजूने ट्विट केले. ( MNS MLA takes MP Sambhaji Raje's side: Tweeting and saying that ... )

संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थनार्थ आता मनसेने पुढाकार घेतलेला दिसतो आहे. कल्याण ग्रामीणचे आणि मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी संभाजीराजेंना सर्वच पक्षांनी मिळून बिनविरोध पाठविण्याचे आणि पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे, असे ट्वीट केले आहे. दरम्यान या ट्वीटमध्ये त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधलेला दिसतो. (Sambhaji Raje News)

मनसेचे आमदार राजू पाटील हे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, 'राज्यातील गडकिल्ले संवर्धन व मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी? प्रत्येक गोष्टीत राजकारणच केलेच पाहिजे का?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर 'सर्वच पक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठविण्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे', असं देखील राजू पाटील यांनी आपल्या ट्वीटच्या शेवटी म्हणाले आहेत.

दरम्यान, सर्वपक्षांनी मिळून मला राज्यसभेवर निवडून द्यावं, असे आवाहन संभाजीराजेंनी केले होते. सहाव्या जागेसाठी रस्सीखेच सुरु होती. शिवसेनेने संभाजीराजे यांना शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी ऑफर दिली होती. मात्र, संभाजीराजे यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेनेने मंगळवारी आपला उमेदवार जाहीर केला. त्यांच्याकडून कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. एकंदरीतच पाहिलं तर राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये संभाजीराजेची एन्ट्री झाल्याने चुरस वाढली आहे. शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर आता भाजप काय भूमिका घेते, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT