मनसे विरोधातील कारवाईची धार कमी होणार? बाळा नांदगावकर मैदानात; भेटीगाठींना वेग

MNS | Raj Thackeray : बाळा नांदगावकांच्या कालपासून उच्चस्तरीय भेटीगाठी सुरु
MNS Leader Bala Nandgaonkar
MNS Leader Bala NandgaonkarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत, तर ४ मे पासून हनुमान चालिसा आंदोलन करण्याचा इशारा मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला होता. त्यानंतर पोलिसांनी ३ मे पासून राज्यभरातील मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेत्यांविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. अनेकांना १४९ कलमांतर्गत प्रतिबंधात्मक नोटीसा बजावल्या. तर अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. याशिवाय मनसे नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) आणि स्वतः राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

(Raj Thackeray Latest news)

मनसे विरोधातील याच कारवाईनंतर आता मनसे नेते बाळा नांदगावकर मैदानात उतरले आहेत. बाळा नांदगावकर यांनी आज गृहमंत्री बाळा नांदगावकर यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे २० मिनीट चर्चा झाली. त्यानंतर नांदगावकर शिवतीर्थ इथे राज ठाकरे यांच्याभेटीसाठी गेले. त्यांनी काल मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे आणि पोलिस सह आयुक्त (गुन्हे) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली. मनसे विरोधातील कारवाईची धार कमी करण्याबाबत या भेटीत चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे.

MNS Leader Bala Nandgaonkar
राणांसह इतरांवरील देशद्रोहाच्या गुन्ह्यांचं काय होणार? आजचा दिवस महत्वाचा

राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

राज ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहुन मनसेविरोधातील कारवाईवरुन तीव्र नाराजी व्यक्त केली होती. राज ठाकरे पत्रात म्हणाले, सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आणि विविध उच्च न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ४ मे रोजी 'भोंगे उतरवा' आंदोलन सुरु करण्यापूर्वीच त्यांची ठिकठिकाणी धरपकड करण्यात आली. तब्बल २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केले आणि अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी!

MNS Leader Bala Nandgaonkar
कीर्तनकार इंदुरीकर अडचणीत; त्या वादग्रस्त वक्तव्यावरुन गुन्हा दाखल होण्याची शक्यता

गेल्या आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की, मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का?

आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले रझाकार आहेत! अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com