Dhairyasheel Mohite Patil-Jaykumar Gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politic's : सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्रिपद न मिळण्याचे पाप मोहिते पाटलांचेच : जयकुमार गोरेंचा पलटवार

Jaykumar Gore VS Dhairyasheel Mohite Patil : काहींना शिंगं फुटली आणि सोलापूर जिल्ह्याची राजकीय घडी विस्कटली, असेही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटले होते.

Vijaykumar Dudhale

Solapur, 20 July : सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्रिपद न मिळण्याचे पाप मोहिते पाटील यांच्यामुळेच झाले आहे, असा पलटवार भाजप नेते तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर केला आहे, त्यामुळे मोहिते पाटील आणि जयकुमार गोरे यांच्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप रंगण्याची चिन्हे आहेत.

खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil ) यांनी ‘सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्रिपद मिळाले नाही, याची खंत वाटते,’ असे म्हटले होते. तसेच, सोलापूर जिल्ह्याची राजकीय घडी विस्कटली आहे, असेही त्यांनी म्हटले होते. खासदार मोहिते पाटील यांच्या टीकेला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दोनच वाक्यात उत्तर दिले आहे.

काहींना शिंगं फुटली आणि सोलापूर जिल्ह्याची राजकीय घडी विस्कटली, असेही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटले होते. त्याला उत्तर देताना जयकुमार गोरे (Jaykumar Gore ) यांनी ‘ते स्वतःबदल बोलले असावेत,’ असे सणसणीत टोला त्यांनी माढ्याच्या खासदारांना लगावला.

हिंदी भाषा लागू केली तर आपण शाळाही बंद पाडू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला होता. त्याला उत्तर देताना गोरे म्हणाले, कधीतरी, कायतरी चालू करण्यासंदर्भात बोलावं. कायम बंद पाडणारी भाषा ही महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणारी भाषा नाही, त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की, महाराष्ट्र ही मराठी भषिकांची भूमी आहे, त्यामुळे इथे मराठीचा सन्मान होतच असतो.

जेव्हा आपण विकसित महाराष्ट्राची संकल्पना मांडतो, तेव्हा अनेक भाषांना घेऊन पुढं जावं लागतं. त्या सर्वांना पुढे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. इथं कोणालाही कसली सक्ती नाही. पण, आता निवडणुका आलेल्या आहेत, त्यामुळे मराठीप्रेम जागं झालेलं आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे होतेय, असंही सांगितलं जाईल. निवडणूक झाल्यावर हे सर्व थांबलं जातं. चिमणी आपलं घरटं पावसाळ्यात बांधायला घेते, पण चिमणीचं घरटं कधीच पूर्ण होत नाही. त्यामुळे निवडणुकीपुरतं मराठी आणि मुंबईचं प्रेम सत्तेपर्यंत कधीच पोचत नाही, असा टोला गोरेंनी ठाकरे बंधूंना लगावला.

वारीबद्दल तक्रार करणारा एकही माणूस भेटला नाही

आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च म्हणजे तब्बल 27 लाखांच्या वर वारकारी यंदाच्या आषाढी वारीसाठी आले होते. वाटेत कोट्यवधींच्या संख्येने पालख्यांचे दर्शन घेतले. प्रत्येक ठिकाणी वारकऱ्यांसाठी सुविधांची तयारी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केली होती. त्यातून आज वारी यशस्वीपणे पार पडली आहे. वारीबद्दल तक्रार करणारा एकही माणूस आम्हाला भेटलेला नाही. त्याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT