Shivsena Politic's : उद्धव ठाकरे अन्‌ एकनाथ शिंदेंच्या एकत्र येण्याबाबत शिवसेना मंत्र्याचे मोठे विधान; म्हणाले ‘ते दोघेही मिठ्या मारतील...’

Uddhav Thackeray- Eknath Shinde : राजकारणात काही सांगता येत नाही. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो, असे सांगून भविष्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील.
Eknath Shinde-Uddhav Thackeray-Pratap Sarnaik
Eknath Shinde-Uddhav Thackeray-Pratap Sarnaiksarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 20 July : शिवसेनेत उभी फूट पाडून मुख्यमंत्रिपद पटकावलेले एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे एकमेकांकडे पाहतही नाहीत. शिंदे आणि ठाकरे हे एकमेकांवर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र, हे दोघे मिठ्या मारतील, असे मोठे विधान शिवसेनेचे नेते तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एकत्रिकरणाची चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकत्र येण्याची चर्चा नाकारत असले तरी पडद्याआडून बऱ्याच घडामोडी सुरू असल्याचे संकेत मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तर त्याबाबत सूचक विधान केले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणायच्या असतील तर भाजपसोबत बोलावे लागेल, असे विधान तटकरे यांनी केले आहे, तटकरे यांच्या या विधानामुळे पडद्याआडून बऱ्याच घडामोडी सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

दुसरीकडे, शिवसेनेत मात्र अद्यापही कटुता भरलेली आहे. दोन्ही शिवसेनेतील नेते एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडतात. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांच्या समोरासमोर आल्यानंतर घडलेला प्रसंग संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. उद्धव ठाकरे समोर येताच एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) तारांबळ उडाली होती. तसेच, दोघांच्या मध्ये नीलम गोऱ्हे बसल्या होत्या.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असले तरी त्यांच्या एकत्र येण्याबाबत शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, आज तुम्हाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं जे चित्र दिसत आहे. पण, सुमारे १९ वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन केल्यानंतर तेही उद्धव ठाकरेंशी बोलत नव्हते. ते एकमेकांकडे बघत नव्हते, हसत नव्हते आणि बोलतही नव्हते. मात्र, पाच जुलै रोजी राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना अलिंगन दिलं.

Eknath Shinde-Uddhav Thackeray-Pratap Sarnaik
Siddaramaiah Shivakumar clash : शिवकुमार कार्यक्रम सोडून गेले, सिध्दरामय्या संतापले अन्..; नेत्यांमधील धुसफूस चव्हाट्यावर आल्याने खळबळ

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी नुकतच एकमेकांना अलिंगन दिलं आहे. यदाकदाचित हाच प्रसंग भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबतही होऊ शकतो. मात्र, त्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागेल, असा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray-Pratap Sarnaik
Shashikant Shinde : पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होताच शशिकांत शिंदेंनी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी केली ही प्रार्थना!

राजकारणात काही सांगता येत नाही. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो, असे सांगून भविष्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील, असा आशावाद सरनाईक यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com