Subhash Patil joins BJP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : मोहिते पाटलांच्या कट्टर विरोधकाचा विजयदादांच्या उपस्थितीतच भाजपत प्रवेश

सुभाष पाटील यांनी १९९०, १९९५ आणि १९९९ या तीनही विधानसभा निवडणुकीत विजयदादांच्या विरोधात चुरशीचा लढा दिला होता.

सुनील राऊत

नातेपुते (जि. सोलापूर) : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijay Singh Mohite Patil) यांचे कट्टर विरोधक सुभाषअण्णा पाटील (Subhash Patil) यांनी आपले परंपरागत राजकीय वैर संपवून सोमवारी (ता. १२ डिसेंबर) रात्री विजयदादांच्याच उपस्थितीत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करत पुन्हा स्वगृही परतले. सुभाष पाटील यांच्या प्रवेशामुळे माळशिरस (Malshiras) तालुका खऱ्या अर्थाने भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. (Mohite Patil's staunch opponent Subhash Patil joins BJP)

या घटनेचे वैशिष्ट्ये असे की, सुभाष पाटील यांनी १९९०, १९९५ आणि १९९९ या तीनही विधानसभा निवडणुकीत विजयदादांच्या विरोधात चुरशीचा लढा दिला होता. सुभाष पाटील यांची एकही सहकारी संस्था नाही. साखर कारखाने नाहीत. फक्त आणि फक्त स्वतःचा समाज आणि आपली वैयक्तिक प्रतिमा याच्या जीवावर त्यांनी आपले राजकारण केले.

मोहिते पाटील विरोधक म्हणून त्यांचा संपूर्ण राज्यात नावलौकिक आहे. भाजपचा पाया माळशिरस तालुक्यात रोवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. परंतु तत्कालीन नेते (स्व.) गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनी बेरजेच्या राजकारणात (स्व.) प्रतापसिंह मोहिते पाटील यांना भाजपमध्ये घेऊन मंत्रीपदी आरुढ केले होते. त्याचा राग मनात ठेवून सुभाष पाटील यांनी भाजपचा त्याग केला होता.

मोदी आणि फडणवीस यांच्या कामाचा धडाका पाहता त्यांचा जीव दुसऱ्या पक्षात रमेना आणि भाजपमध्ये येण्याचे त्यांनी निश्चित केले. त्यानुसार त्यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप पक्षप्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम के. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुभाष पाटील यांच्या निवासस्थानी झाला.

या समारंभास जिल्हा संघटक व शिवामृत संघाचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सोपानराव नारनवर, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, माळशिरसचे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, माळशिरस विकास सोसायटीचे अध्यक्ष संदीप पाटील, ॲड. नितीन खराडे, माळशिरसचे शहराध्यक्ष संतोष वाघमोडे, विष्णुपंत केमकर आदी या प्रसंगी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT