MP Darhysheel Mane
MP Darhysheel Mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Video Shakti Peeth Highway : 'देवांच्या नावाखाली आमच्या घरांवर कोणी नांगर...' खासदार माने कडाडले !

Chaitanya Machale

Sangli News : सांगली, कोल्हापूरसह राज्यातील 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटासह अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे.

हा मार्ग रद्द करावा, यासाठी कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये आंदोलने केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे या विरोधात मोर्चा काढून आपला विरोध दर्शविण्यात आला होता.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते धैर्यशील माने यांनी देखील या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. 'देवांच्या नावाखाली कोणी आमच्या घरावर नांगर फिरवत असेल तर देव सुद्धा त्याला माफ करणार नाही' अशा शब्दात खासदार माने यांनी राज्य सरकारला सुनावत या महामार्गाला आपला विरोध असल्याचे सांगितले. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून जात असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शनिवारी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसच्या (Congress) वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनाच्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी उपस्थित राहत या आंदोलनाला पाठींबा दिला. त्यावेळी त्यांनी शक्तीपीठ महामार्गावरून राज्य सरकारवर टीका करत घरचा आहेर दिला. ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग होणार आहे. शक्तीपीठ महामार्ग शक्ती वाढवणारा आहे का शक्ती काढून घेण्याचा महामार्ग हे काही कळेना झाले आहे. देवांच्या नावाखाली आमच्या घरावर कोणी नांगर फिरवत असेल तर देव सुद्धा त्याला माफ करणार नाही.अशी टीका त्यांनी केली.

या महामार्गला विविध जिल्ह्यातून मोठा विरोध होत आहे. या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमीनी जात असल्याचे शेतकऱ्यांनी कडाडून विरोध सुरू केला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील हा प्रश्न उचलून धरला असून शेतकऱ्यांवर अन्याय करणार हा महामार्ग होऊ देणार नाही, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली आहे.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसने याविरोधात आंदोलन केलं. यावेळी काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम, (Vishwjit Kadam) खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते. विरोधकांबरोबरच आता सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदारांनी देखील या महामार्गाला विरोध केल्याने यामध्ये राज्य सरकाराला दोन पावले मागे घेत निर्णय घ्यावा लागणार असल्याचे समोर आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT