Sambhaji Raje  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

खासदार संभाजी राजे साधणार शेतकऱ्यांच्या मुलांशी संवाद

खासदार संभाजी राजे उद्या ( मंगळवारी ) अहमदनगरला येणार आहेत.

अमित आवारी

अहमदनगर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या खासदार संभाजी राजे यांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे. उद्या (ता. 5 ) ते अहमदनगर जिल्ह्यात येणार असून ते शेतकऱ्यांच्या मुलांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेणार आहेत. ( MP Sambhaji Maharaj will interact with the children of farmers )

शेतकऱ्यांची सध्या परिस्थिती जाणून घेण्यासाठी उद्या मंगळवारी (ता. 5) खासदार छत्रपती संभाजी राजे अहमदनगर येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी सामाजिक, शेती विकास कामात अग्रेसर असलेल्यांचा गौरव केला जाणार आहे. यावेळी छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या अहमदनगर येथील स्मारकाचे नूतनीकरण कामाचा प्रारंभ होणार असल्याची माहिती युवक नेते यशवंत तोडमल यांनी दिली.

अहमदनगर येथे न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात करविरचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचे स्मारक आहे. स्मायलिंग अस्मिता शेतकरी कष्टकरी विद्यार्थी संघटनेने या स्मारकाच्या नूतनीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते वनीकरण कामाचा प्रारंभ होणार असून यावेळी खासदार संभाजी राजे शेतकरी विद्यार्थ्यांशी संवाद साधून सध्याच्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीची माहिती घेणार आहेत.

या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक चे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्यासह सामाजिक आणि शेतकरी चळवळ शेती विकासासाठी योगदान देणारे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला शेतकरी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन युवक नेते यशवंत तोडमल, प्रा. सदाशिवराव निर्मळ, ऋषिकेश दुसंगे, अभिजीत दरेकर शुभम पांडुळे, गजानन भांडवलकर, अजित कोतकर, सचिन सापते, असलम शेख, धीरज कुमटकर, अक्षय शेळके, जैद शेख, संभाजी कदम यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT