छत्रपती संभाजी राजे म्हणाले, "पेट्रोल दरवाढ आपल्या हातात नसते'' 

"पेट्रोलची दरवाढ कोणाच्याच हातात नाही. त्यामुळे त्याबाबत मी काय बोलणार? असा प्रश्‍न करीत आगामी अधिवेशनात राज्यसभा चालली तर अनेक महत्वाचे प्रश्‍न मांडण्याचा प्रयत्न मी करेन,'' असे खासदार, छत्रपती संभाजी महाराज यांनी आज येथे सांगितले.
छत्रपती संभाजी राजे म्हणाले, "पेट्रोल दरवाढ आपल्या हातात नसते'' 
Published on: 
Updated on: 

नाशिक : "पेट्रोलची दरवाढ कोणाच्याच हातात नाही. त्यामुळे त्याबाबत मी काय बोलणार? असा प्रश्‍न करीत आगामी अधिवेशनात राज्यसभा चालली तर अनेक महत्वाचे प्रश्‍न मांडण्याचा प्रयत्न मी करेन,'' असे खासदार, छत्रपती संभाजी महाराज यांनी आज येथे सांगितले. 

रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष, खासदार, छत्रपती संभाजी महाराज यांनी आज येथील रामशेज किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते किल्ला चढुन गेले. त्यांनी त्याची पाहणी करुन बारीकसारीक तपशील समजुन घेतला. त्याच्या नोंदी घेऊन त्यावर स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले, ''रामशेज किल्ल्याला दिलेली भेट माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि हा खानदेशचा महत्वाचा किल्ला आहे. त्यादृष्टीने त्याच्या विकासाला प्राधान्य देऊ."

ते पुढे म्हणाले, "दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्यातील सत्तेचाळीस किल्ले रायगड विकास प्राधिकरणांतर्गत समाविष्ट केले जाणार आहेत. त्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभाग आणि अन्य संबंधीत विभागांत एक सामंजस्य करार केला जाईल. या प्राधिकरणाचे 660 कोटींचा आराकढा असल्याने या किल्ल्यांच्या विकासाला त्याची मदत होईल. यासंदर्भात अन्य किल्ल्यांचाही विविध योजनांत समाविष्ट करुन विकास करु." 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com