Rajesh Patil -Sanjay Mandlik  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : राजेश पाटलांनी अजितदादांसमोरच मेहुणे मंडलिकांना काढला चिमटा; ‘तेव्हा खासदार माझ्याविरोधात होते...’

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज (ता. १० फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. विविध विकासकामांच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाला महायुतीतील खासदार, आमदार आणि पालकमंत्री उपस्थित होते. याच व्यासपीठावरून चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांना चिमटा काढला. त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील आठवण करून देत काढलेला चिमटा मेळाव्यात चर्चेचा विषय ठरला. चंदगडचे आमदार राजेश पाटील हे खासदार संजय मंडलिक यांचे दाजी आहेत. दाजींनी मेहुण्याला काढलेल्या चिमट्याने कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला होता. (MP Sanjay Mandlik was against me in the previous assembly elections: MLA Rajesh Patil)

आमदार राजेश पाटील यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानून आपला मोर्चा खासदार संजय मंडलिक यांच्याकडे वळविला. माझ्या विजयामागे माझे मेहुणे खासदार संजय मंडलिक यांचा खारीचा वाटा आहे. त्यावेळी शिवसेनेकडून मंडलिक यांनी संग्रामसिंह कुपेकर यांना उमेदवारी दिली. (Kolhapur Politics )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माझे मेहुणे खासदार मंडलिक हे माझ्या विरोधातील उमेदवाराचा प्रचार करत होते. पण, चंदगडच्या प्रामाणिक जनतेने मला लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रेमाखातर निवडून दिले. त्यामुळे खासदार मंडलिक यांचे नाव घेतले. माझे मेहुणे उगीच रुसायला नकोत, अशा शब्दांत आमदार पाटील यांनी खासदार मंडलिक यांना चिमटा काढला.

कोल्हापूरमधून 10 पैकी 5 आमदार राष्ट्रवादीचे निवडून आणू

याच व्यासपीठावरून बोलताना आमदार राजेश पाटील यांनी चंदगडचे सर्व कार्यकर्ते आज अजित पवार यांच्या पाठीशी आहेत. छातीची ढाल करून सर्व संकटे आम्ही कार्यकर्ते परतून लावू. पण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदी पाहण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. चंदगडच्या जनतेचा आशीर्वाद महायुतीच्या सरकारला आहे.

लोकसभेच्या दोन्ही जागा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी पाच विधानसभेच्या जागा राष्ट्रवादी मिळवेल, असा विश्वास व्यक्त करत तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असा शब्दच आमदार पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात अजित पवार यांना दिला.

Edited By : Vijay Dudhale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT