Ajit Pawar News : 'पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार त्यांना विनंती...' अजित पवार म्हणाले,

Narendra Modi :शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची झालेली हत्येची घटना अत्यंत चुकीची असल्याचे अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान त्यांच्या दौऱ्यात सातारा जिल्ह्यातील विकासकामांचे लोकर्पण होईल. त्यामुळे पुणे एअरपोर्ट तसेच मेट्रोची कामे अंतिम टप्यात असल्याने त्यांचे देखील उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असल्याची चर्चा होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबाबत उत्तर दिले आहे.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा सातारा येथे नियोजित कार्यक्रम आहे. पंतप्रधानांना पुणे एअरपोर्ट तसेच पुणे मेट्रो रेल्वे स्टेशनची उद्घाटन करण्याची विनंती करणार आहे. पंतप्रधान यांचे कार्यक्रम हे पूर्वनियोजित असल्याने याबाबत काय निर्णय घ्यायचा हे पंतप्रधान कार्यालयात ठरवेल.' असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

Ajit Pawar News
Nikhil Wagle: निखिल वागळेंवर पुण्यात गुन्हा दाखल; 'निर्भय बनो ' सभा वाद पेटणार?

अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज ( शुक्रवारी ) सकाळी पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाची पाहणी केली. लोहगाव विमानतळ मोठे व्हावे यासाठी दिवंगत आमदार गिरीश बापट यांनी खूप प्रयत्न केले होते. केंद्र सरकारच्या नागरी हवाई मंत्रालयाकडे वारंवार पाठपुरावा करून यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणि मान्यता घेण्यात आल्या आहेत. या विमानतळाचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विमानतळ विस्तारीकरणाचे तसेच मेट्रो स्टेशनचे उद्घाटन त्यादिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहून करता येणे शक्य होत नसेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या एखाद्या कार्यक्रमात या कामांचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करता येतील का? यासाठी देखील आमचा प्रयत्न राहणार आहे. तशी विनंती देखील पंतप्रधान मोदी यांना करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न

शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची झालेली हत्येची घटना अत्यंत चुकीची असल्याचे अजित पवार म्हणाले. गोळ्या झाडण्यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये दोघं एकमेकांशी एवढं चांगलं बोलत होते. हसत असल्याचे दिसत आहे. नेमकं काय घडलं, हे पाहायला हवं. या घटनेवरुन विरोधकांकडून सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. विरोधकांना हे निमित्त मिळालं आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

(Edited By Roshan More)

Ajit Pawar News
Chhagan Bhujbal : फारच भयानक चाललंय खरं, तरीही गृहमंत्री जबाबदार कसे?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com