Patan Shivsena News : पाटण विधानसभा मतदारसंघातील तळमावले येथे उद्या (रविवारी) शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा शिवसंवाद मेळावा आयोजित केला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात होणाऱ्या या मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. खासदार राऊत मेळाव्यात काय बोलणार, याबद्दल जनतेत मोठी उत्सुकता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या CM Eknath Shinde बंडाला यशस्वीपणे साथ देणारे सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात उद्या (रविवारी) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांची सभा होत आहे. शिवसेनेत फुट पाडण्यास शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली आहे. त्यामुळे त्यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत पाटणमधून पराभूत करण्यासाठी ठाकरे गट शिवसेनेने चंग बांधला आहे.
यापूर्वी पाटण तालुक्यात युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचीही सभा झाली होती. त्यांनी मंत्री देसाई यांच्यावर सडेतोड टीका केली होती. सध्या मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असून विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर हे न्यायालयाच्या सूचनेनुसार या आमदारांवर कारवाईबाबत निर्णय घेणार आहेत.
पण, या यादीत शंभूराज देसाई यांचे नाव नसले तरी सत्ता बदलाच्या घडामोडीत शंभूराज देसाई हे अग्रभागी होते. त्यामुळे त्यांना आगामी निवडणुकीत पाडण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची उद्या (रविवारी) पाटण मतदासंघात सभा होत आहे.
तळमावले जवळ गुढेफाटा येथे श्री गणेश मंगल कार्यालयात दुपारी चार वाजता होणाऱ्या मेळाव्यास पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख नितीन बानुगडे- पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे, प्रवीण शिंदे, सातारा जिल्हा प्रमुख हर्षद कदम, जिल्हा संघटक गजानन कदम, सतीश काळगावकर आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शिवसंवाद मेळाव्याचे आयोजन सातारा उपजिल्हाप्रमुख रवींद्र पाटील, पाटण तालुका प्रमुख सचिन आचरे, सुरेश पाटील यांनी केले आहे. दरम्यान, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात होणाऱ्या या मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. खासदार राऊत मेळाव्यात काय बोलणार? याबद्दल जनतेत मोठी उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.