-राजेश सोळस्कर
Satara BJP News : खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात झालेला वाद अयोग्य होता. रस्त्यावरची भांडणं ही भाजपची संस्कृती नव्हे, अशी टिप्पणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
श्री. बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांनी काल ‘सकाळ’च्या पुणे कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ‘सकाळ’च्या राज्यभरातील संपादकांशी त्यांनी व्हीसीद्वारे संवाद साधला. यावेळी सातारा बाजार समितीच्या जागेवरून खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांच्यामध्ये वाद झाला होता त्याविषयी विचारले होते.
बावनकुळे म्हणाले, ‘‘खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामध्ये झालेला वाद अयोग्य होता. रस्त्यावर येऊन वाद घालणं, ही भाजपची संस्कृती कधीही नव्हती आणि नसेल. खरेतर दोघांनी एकत्र बसून, चर्चा करून एखाद्या प्रश्नावर मार्ग काढायला हवा.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांना समजावून सांगितले आहे. मीही पुन्हा असा प्रकार होऊ नये म्हणून दोन्ही राजेंना विनंती करणार आहे. उदयनराजे हे केंद्रात तर शिवेंद्रसिंहराजे हे राज्यात आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद होणे अपेक्षित नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.