Satara : खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील कलगीतुरा पुन्हा सुरू झाला आहे. सातारा विकास आघाडीच्या सुसंवाद अभियानांतुन उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रराजे यांच्यावर तोफ डागली आहे. उदयनराजे म्हणाले, मी केवळ तोंडाच्या वाफा सोडणारा माणूस नाही. जे विकास कामांवर टीका करतात त्यांनी आपण स्वतः काय केले याचे आत्मपरीक्षण करावे असा टोला त्यांनी शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव न घेता लगावला.\
सातारा विकास आघाडी सुसंवाद अभियानांतर्गत उदयनराजे भोसले(Udayanraje Bhosale) यांनी कार्यकर्ता मेळाव्यात संवाद साधला. यावेळी त्यांनी आमदार शिवेंद्रराजेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. उदयनराजे म्हणाले, एखादा जो कोणी पदावर बसतो आणि कामे करत नाही त्याची त्या पदावर बसण्याची लायकी नसते. उदयनराजे मात्र विकास कामे करताना तोंडाच्या वाफा सोडत नाही . एखाद्याची पत ही त्यांने केलेल्या विकास कामावरून ओळखली जाते असंही खासदार उदयनराजे यावेळी म्हणाले.
उदयनराजे नेमकं काय म्हणाले...?
तसेच ज्या वेळेला मी माझ्या समाजकारणाची साताऱ्यातून सुरुवात केली त्यावेळेला साताऱ्याचा बायपास रस्ता नव्हता . समाजकारणातून सर्वसामान्यांचा विकास हे माझ्या कामाचे सूत्र होते . गेल्या तीन दशकाच्या वाटचालीत साताऱ्यात जास्तीत जास्त विकास कामे करून सातारा शहराला उन्नत स्थान देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. (Latest Marathi News)
सातारा विविध विकासकामांनी युक्त असा आहे जे नावे ठेवतात त्यांनी ती जरूर ठेवावी. मात्र, स्वतःला अगोदर विचारावे आपण काय काम केलं . उगाच नुसतं हे केलं ते केलं असं सांगण्यापेक्षा मूलभूत विकास कामे आपण त्यावेळी का केली नाही ? याची उत्तरे संबंधितांनी द्यावीत असा टोला उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे (Shivendraraje Bhosale) यांचे नाव न घेता लगावला.
उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये त्यांनी लोक सहभागातून राज्यकारभाराची सुसूत्रता राबवली, तो प्रामाणिक प्रयत्न सध्याच्या प्रशासनामध्ये असणे गरजेचे आहे . सातारा एमआयडीसीची स्थापना होऊन इतकी वर्ष झाली त्याचा विकास का झाला नाही ?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, किशोर शिंदे, निशांत पाटील, वसंत लेवे, माजी नगराध्यक्ष रंजना रावत,संग्राम बर्गे, संजय पाटील, स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक, अनिता घोरपडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.