

NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून सत्तेत गेलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटापासून लांब होऊन विरोधकांच्या बाकावर बसण्याची मागणी करणाऱ्या आमदार आव्हाडांना अजित पवार यांनी भलताच इशारा दिला.
"काही काळजी करू नका, घोडा-मैदान लांब नाही, उद्यापासून (सोमवारी) पाहायला मिळेल", असे सांगून अजितदादांनी भविष्यातील नव्या घडामोडीचे संकेतही दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिले अधिवेशन होत आहे. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चढाओढ सुरू असून या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गटात जुंपण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचा 'चहापान'चा कार्यक्रम पार पडला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांना जितेंद्र आव्हाडांनी विरोधी बाकावर बसण्यासंदर्भातील विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्राबाबत प्रश्न विचारण्यात आला.
यावर अजितदादांनी "काही काळजी करू नका, घोडा मैदान लांब नाही, उद्यापासून (सोमवारी) पाहायला मिळेल", असे उत्तर जितेंद्र आव्हाडांना त्यांनी आपल्या स्टाईलने दिले.
जितेंद्र आव्हाडांनी पत्रात काय म्हटलं?
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ आमदारांनी सरकारमध्ये सामिल होत मंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी राष्ट्रवादी पक्षाच्या उर्वरीत सदस्यांची विधानभा सभागृहात विरोधी पक्षासाठी असणाऱ्या आसनावर बसण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा विनंतीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रावर बोलताना अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाडांना एक प्रकारे वठणीवर आणत जोरदार उत्तर दिले आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.