Chandrakant Patil And Vishal Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'जयश्री पाटलांचा प्रचार नडला? भाजपने विशाल पाटलांवर हल्लाच चढवला; काँग्रेस प्रेमावरूनही घेरलं

BJP on Vishal Patil support to jayashree patil : सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी दोन एक एक दिवसांच्या आधी भाजपने आमचे घराणे फोडले असा आरोप केला होता. ज्यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे.

Aslam Shanedivan

Sangli News : काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ही बाब अपक्ष खासदार विशाल पाटील यांना खटकली. त्यांनी याबाबत जाहीर नाराजी बोलून दाखवली. तर सोलापूर येथे एका कार्यक्रमात भाजपने आमचे घरं फोडले असा आरोप केला. यानंतर आता सांगलीत भाजपकडून पलटवार करण्यात आला आहे. खासदार विशाल पाटील यांचे आता काँग्रेसबद्दल प्रेम ओतू जात आहे. पण विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नव्हे तर अपक्ष जयश्री पाटील यांचा प्रचार केला होता. त्यावेळी कुठे होतं त्यांचे काँग्रेस प्रेम. ते नक्की कोणत्या विचाराचे आहेत. हे ठरवावं आणि आपला पक्ष निश्चित करावा असा टोला लगावला आहे.

भारतीय जनता पक्षाने आमच्या घरात फूट पाडण्यासाठी जयश्री पाटील यांचा पक्ष प्रवेश घडवून आणला. मला देखील पालकमंत्री चंद्रकांत पाटील सतत भाजपच्या प्रवेशाची ऑफर देत असतात. पण मी काँग्रेसी विचारांचा आहे. त्यांच्या दोन टर्म खासदार असणार्याला पाडून निवडून आलो आहे. त्यामुळे मी काँग्रेसचा असल्याचे खासदार विशाल पाटील यांनी सांगितले होते. यावर भाजपच्या वि. द. बर्वे यांनी प्रसिद्धिपत्रकातून खरपूस समाचार घेतला आहे.

बर्वे यांनी पत्रकात म्हटले आहे, की मी भाजपचा मतदार असून केवळ काँग्रेसने शिवसेनेच्या आहारी जाऊन काँग्रेसचे तिकीट कापले होते. उद्धव ठाकरे यांनी दादा घराणे संपावे, म्हणून विशाल पाटील यांचे तिकीट कापले होते. वसंतदादा घराण्यावर अन्याय झाल्याने खासदार विशाल पाटील यांना मतदान केले. मात्र खासदार पाटील यांना आता काँग्रेसबद्दल प्रेम उफाळून आल्याचे दिसत आहे.

पण केवळ जयश्री यांच्या भावबंधनामुळे त्यांनी प्रचारात भाग घेतला. त्यांचे खरेच काँग्रेसवर प्रेम असते तर सांगली विधानसभेसाठी काँग्रेसने दिलेला उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्यासाठी जीवाचे रान केले असते. मात्र त्यांनी अपक्ष जयश्री पाटील यांची बाजू घेतली. त्या जयश्री पाटील यांनी केवळ शेतकरी बँकेतील भानगडीतून वाचण्यासाठी संघसंस्कारित भाजपत प्रवेश केला आहे.

लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील हे कसे विजयी झाले. हे मी जाहीरपणे सांगू शकत नाही. लोकसभेतील विजय ही विशाल पाटलांसाठी लॉटरी होती, असे सूचक वक्तव्य भाजप नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केले. भाजपने वसंतदादा पाटील यांचे घर फोडले, या आरोपातही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, विशाल पाटील लोकसभेला कसे निवडून आले, हे मी काही जाहीरपणे सांगू शकत नाही. ती लॉटरी होती. त्यांची ताकदच होती, तर मग लोकसभेच्या मागच्या निवडणुकीत ते का विजयी झाले नाहीत. प्रत्येक वेळी परिस्थिती बदलते. यावेळी बदलली. त्यांना अनुकूल झाली. ते विजयी झाले. पण आता मी अपक्ष खासदार झालो म्हणजे मी राजा झालो, अशी भावना त्यांच्यात तयार झाली आहे. ते सर्वच विषयात टिपणी करू लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT