
Solapur News : भारतीय जनता पक्षाने आमच्या घरात सुद्धा फुट पाडली, त्यांना याचा भविष्यात पश्चाताप तर होणारच असा हल्लाबोल अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी केला आहे. काँग्रेसच्या बंडखोर नेत्या, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा तथा मदनभाऊ गटाच्या नेत्या जयश्री पाटील यांनी नुकसाच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्यांदा विशाल पाटील यांनी टीका केली आहे. ते सोलापुरात बोलत होते. यावेळी खासदार प्रणिती शिंदे देखील उपस्थित होत्या.
भारतीय जनता पक्षाने आमच्या घरात फुट पाडण्यासाठी आमच्या एका वहिनींना पक्षात प्रवेश घडवून आणला. फक्त प्रवेशच घडवून आणला नाही. तर आमचे पालकमंत्रीही दररोज मलाही पक्ष प्रवेशाची ऑफर देत असतात. पण मी, दोन वेळा खासदार राहिलेल्या त्यांच्याच नेत्याला पाडून अपक्ष खासदार बनलो आहे. माझ्यात काँग्रेसचे विचार आहेत, असा टोला विशाल पाटील यांनी भाजपसह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.
...तर त्यांना निश्चित पश्चाताप होणार
भाजपला वसंतदादा घराणे फोडयचेच होते. त्यासाठी आधी मला ऑफर देण्यात आल्या. पण मी गळाला लागत नाही, म्हणून आमच्या वहिणी फोडल्या. आमचं घर फोडलं. पण मी अपक्ष म्हणून निवडून आलो असलो तरी काँग्रेसच्या विचारांचा आहे. त्यामुळे काँग्रेसचे विचार असे सहजासहजी दाबता येत नाहीत.
राज्यात एकीकडे काँग्रेससाठी चिंता जनक स्थित असताना मी एकमेव अपक्ष खासदार म्हणून निवडून आलो. अपक्ष खासदार असलो तरी मी काँग्रेसच्या विचारांचा आहे. त्यामुळे काही व्हायचं आहे ते होऊ द्या, तुरुंगात जायला लागलं तरी मी मागे हटणार नाही. माझ्यानंतर दहा-वीस विशाल पाटील तुमच्यातून तयार होतील. असले वार, अडचणी थांबण्याची आमची क्षमता आहे. पण त्यांनी चूक केली असेल तर घाडसाने सामोरं जाण्याची गरज होती. आतातर कार्यकर्त्यांसाठी म्हणत स्वत:च्या संस्था बळकट करण्यासाठी लोक सोडून जात आहेत. पण एकवेळ अशी येईल की त्यांना निश्चित पश्चाताप होईल. येथे काँग्रेस कार्यकर्ते सामान्यालाही नेता बनवू शकतात.
यावेळी विशाल पाटील यांनी भाजप जोरदार टीका करताना, भाजपने फक्त महाराष्ट्र कसा लुटायचा हेच पाहिलं. तसे प्रयत्न केले. महाराष्ट्राला लाचार करण्याचं काम दिल्लीवाल्यानी केले. पण माझा महाराष्ट्र दिल्लीचेही तख्त राखतो, असाही इशारा विशाल पाटील यांनी दिला आहे.
तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान म्हणून दिल्लीत बसतील तो दिवस आता लांब नाही. त्यानंतर गेलेले सगळे म्हणतील आम्हाला घ्या, आम्हाला घ्या त्यावेळी यांना घ्यायचं की नाही हा मोठा प्रश्न असेल. तसेच शक्तीपीठ महामार्गावरून देखील विशाल पाटील यांनी भाजपवर घणाघाती टीका केली असून फक्त जास्तीत जास्त कसा पैसा खाता येईल याचा विचार सध्या सरकार करत असल्याची टीका केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.