Vishal Patil : विशाल पाटलांचा चंद्रकांतदादांवर पलटवार; ‘आमचं काही व्हायचं ते होऊ दे, आमची तुरुंगात जायचीही तयारी; पण आम्ही काँग्रेस सोडणार नाही’

Chandrakant Patil offer To Vishal Patil : असले दहा-वीस विशाल पाटील तुमच्यातून तयार होतील. आमची काँग्रेससोबत थांबयाची क्षमता आहे, असे सांगून चंद्रकांतदादांची ऑफर विशाल पाटलांनी फेटाळून लावली.
Vishal Patil-Chandrakant Patil
Vishal Patil-Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 26 June : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यंतरी खासदार विशाल पाटील यांना भाजप प्रवेशाचे ऑफर दिली होती. तसेच, जयश्रीताई मदन पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर चंद्रकांतदादांनी विशाल पाटील यांच्यासाठी चांगलाच जोर लावला आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या भाजप प्रवेशाच्या ऑफरवर विशाल पाटील यांनी अक्कलकोटमधून जोरदार उत्तर दिले आहे. ‘आमचं काही व्हायचं आहे ते होऊ दे, आम्हाला तुरुंगात जायला लागलं, तरी चालेल पण आम्ही काँग्रेस सोडणार नाही,’ असा पलटवार विशाल पाटलांनी चंद्रकांतदादांवर केला आहे.

अक्कलकोट येथील काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात बोलताना खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी चंद्रकांत पाटील यांना सडेतोड उत्तर दिले आहे. या मेळाव्याला आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, खासदार प्रणिती शिंदे, सुवर्णा मलगोंडा आणि मेळाव्याचे आयोजक मल्लिकार्जून पाटील उपस्थित होते.

खासदार विशाल पाटील म्हणाले, भाजपने आमच्याही घरात फूट पाडली आहे. आमच्या घरातील एका वहिनींना (जयश्रीताई पाटील) भाजपने फूट पाडण्यासाठी त्यांच्या पक्षात घेतले आहे. आमचे (सांगलीचे) पालकमंत्री (चंद्रकांत पाटील Chandrakant Patil) रोज भाषण करतात की, विशाल पाटलांना आम्ही घेणार आहे.

मी अपक्ष निवडून आलो आहे. भाजपच्या दोन टर्म निवडून आलेल्या खासदाराला पाडून मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे. मी जरी अपक्ष असलो तरी काँग्रेसच्या विचारांचा आहे, असं मी लोकांना सांगितलं, त्यामुळे मी निवडून आलो, असे पाटील यांनी नमूद केले.

Vishal Patil-Chandrakant Patil
Mahayuti News : काँग्रेस खासदाराचा मोठा दावा; ‘बीजेपी म्हणजे दो दिन की चांदणी...महायुती लवकरच फुटणार’

काँग्रेसचा विचार एवढा मोठा आहे की, तो सहजा सहजी दाबता येत नाही. काँग्रेस विचारांचा असल्यामुळे मी एकमेव अपक्ष खासदार म्हणून निवडून आलो आहे., त्यामुळे काही व्हायचं आहे ते होऊ दे. आम्हाला तुरुंगात जायला लागलं, अडचणीत यायला लागलं, तरी असले दहा-वीस विशाल पाटील तुमच्यातून तयार होतील. आमची काँग्रेससोबत थांबयाची क्षमता आहे, असे सांगून चंद्रकांतदादांची ऑफर विशाल पाटलांनी फेटाळून लावली.

Vishal Patil-Chandrakant Patil
Ajit Pawar : अवघड वाटणारी ‘माळेगाव’ची निवडणूक अजितदादांच्या ‘त्या’ एका निर्णयामुळे फिरली!

चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटले होते?

विशाल पाटील हे अभ्यासू खासदार आहेत. पण ते थोडे आक्रमक आणि आक्रस्ताळे आहेत, त्यात त्यांनी बदल केला पाहिजे. याची जाणीव त्यांनाही आहे. त्यांचा हा गुण मला आवडतो. त्यांच्यासारख्या व्यक्तीने भाजपमध्ये आले पाहिजे. आमचे त्यांचे स्वागतच करू. विशाल पाटील यांना भाजप प्रवेशाची ऑफर आहे.पण त्यांनी गांभीर्याने विचार न केल्यास आम्ही २०२९ साठी आमचा उमेदवार तयार करू, असा इशाराही दिला आहे. मात्र, विशाल पाटील अजून तरी त्यांना बधले नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com