teacher caste controversy in municipal school Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : नगरसेविकेनं सामाजिक कार्यकर्त्याला अडकविले! विनयभंगाचा गुन्हा दाखल, नक्की काय घडलं?

Municipal councillor molestation case Maharashtra : रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर नगरसेविकेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात नेमकं काय घडलं जाणून घ्या.

Rahul Gadkar

कोल्हापूर शहरातील अनेक नागरिक रस्त्यावर कचरा फेकत असताना चे व्हिडिओ शूट करून ते सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्याचा प्रकार घडला आहे. सातत्याने सर्वसामान्य नागरिकांचा व्हिडिओ व्हायरल करत असताना त्यामध्ये सत्ताधारी नगरसेविकांना देखील वारंवार त्रास दिल्याने संबंधित सत्ताधारी नगरसेविकेने तानाजी जाधव यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा जुना राजवाडा पोलीस ठाणे नोंद केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी १८ ऑगस्ट रोजी संबंधित नगरसेविका सकाळी साडेदहाच्या सुमारास वैयक्तिक कामासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी जाधवने त्यांना अडवले. नगरसेविकेसह तिच्या वडिलांना अर्वाच्च शिवीगाळ करून अश्लील हावभाव केले. त्याचवेळी बघून घेण्याची भाषा वापरत धमकाविले.

रात्री उशिरा नगरसेविकेच्या घरी जाऊन कचरा पडलेल्या ठिकाणी चला, छायाचित्रे काढायची आहेत, असे म्हणून वारंवार मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न तो करीत होता.शिवाय प्रभागातील घंटागाडी अडवत सरकारी कामात अडथळा आणला. तुम्ही प्रभागातील कामे व्यवस्थित करत नाही, असे म्हणत शिवीगाळ केली.

त्याचबरोबर दोन महिन्यांपूर्वी रात्री साडेअकराच्या सुमारास नगरसेविकेच्या घरी येऊन भागात कचरा खूप झाला आहे, त्या ठिकाणी आताच्या आता चला, असे म्हणत आग्रह करू लागला. अशा पध्दतीने वारंवार त्रास दिला. त्यामुळे त्याच्याविरुध्द दाखल फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. भागातील महिलांच्याही तक्रारी

भागात कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या महिलांचे व्हिडिओ बनवण्याचे प्रकार जाधवकडून घडले आहेत. याबाबत अनेक महिलांनी नाराजी व्यक्त करत आमचे व्हिडिओ बनवू नका, कचरा टाकण्यासाठीची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करा, असे त्याला सांगितले होते; मात्र, यानंतरही व्हिडिओ बनवणे सुरूच असल्याने भागातील अनेक महिलांनी त्याच्याविरोधात तक्रारी केल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT