उर्वरित नगरपालिकांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून २१ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.
निकालाच्या उत्सुकतेत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पैजा लावल्या जात असल्याची चर्चा आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले नगरपंचायतीत मामा-भाच्या लढतीवर थेट पाच लाखांची पैज चर्चेचा विषय ठरली आहे.
Kolhapur News : अतुल मंडपे
नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकींचा धुरळा उडाला आहे. उर्वरित नगरपालिकांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच 21 डिसेंबरला निकाल होणार आहे. निवडणूक पार पडलेल्या नगरपालिकांमधील कार्यकर्त्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. तितकीच ईर्षा कार्यकर्त्यांमध्ये देखील दिसून येत आहे. आतापासूनच निकालावर अंदाज लावत अनेक भागात लाखांवर पैजा लागल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले नगरपंचायतीतील मामा भाच्याच्या विजयासाठी थेट पाच लाखांची पैज लागली आहे. त्याची चर्चा सध्या पंचक्रोशीत जोरात सुरू आहे.
नगरपंचायतीचा निकाल अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून हातकणंगले नगरपंचायतीच्या प्रभाग दहामध्ये मामा भाचे निवडणूकीसाठी उभे आहेत. त्यांच्या विजयांसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी तब्बल पाच लाखाची पैज लावली असून तसा पाचशे रुपयांच्या करारनाम्यावर करार करण्यांत आला आहे. याची जोरदार चर्चा परिसरांत सुरू आहे.
हातकणंगले नगरपंचायतीसाठी प्रभाग दहामधून काँग्रेसकडून सागर शामराव पुजारी तर शिंदेंच्या शिवसेनेकडून रणजित बिरु धनगर यांनी निवडणूक लढवली आहे. या प्रभागांत पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला असल्याने यामध्ये बाजी कोण मारणार? हा प्रश्न गुलरस्तांत आहे. तीन तारखेला निकाल जाहिर होणार होता. मात्र तो आता २१ तारखेपर्यंत पुढे ढकलला आहे, त्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान दोघांचेही कार्यकर्ते आपलाच माणूस निवडून येणार अशी बाजी लावत आहेत. यातूनच रणजित धनगर यांच्यासाठी अक्षय विश्वास माने यांने तर सागर पुजारी यांच्यासाठी संताजी लक्ष्मण धनगर यांनी पाच लाखांची पैज लावली आहे. सदर रक्कम पंचासमक्ष रोखीने सौ. दिपाली प्रकाश ठोंबरे यांच्याकडे सोपवण्यांत आली आहे. निकालानंतर सदरची रक्कम पैजेतील विजयी कार्यकत्याला देण्यात येणार असून याचीच आता जोरदार चर्चा पंचक्रोशीसह जिल्ह्यात जोरदार सुरू आहे .
1. उर्वरित नगरपालिकांसाठी मतदान कधी होणार आहे?
➡️ २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
2. नगरपालिकांचे निकाल कधी जाहीर होतील?
➡️ २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होतील.
3. पाच लाखांची पैज कुठे लागली आहे?
➡️ कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले नगरपंचायतीत.
4. पैजा लावण्यामागे कारण काय आहे?
➡️ निकालाबाबत प्रचंड उत्सुकता आणि चुरशीची लढत.
5. कोणत्या लढतीची सर्वाधिक चर्चा आहे?
➡️ हातकणंगलेतील मामा-भाचा लढतीची.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.