Sharad-Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MLC Election : 'विधानपरिषदेची सातारा-सांगलीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे : दोन माजी मंत्र्यांमध्ये उमेदवारीची चुरस

Sharad Pawar NCP News : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुणे, सातारा-सांगली, ठाणे-पालघर या तीन जागा आल्या आहेत. त्यानंतर लगेचच पुण्यातील जागेवरील उमेदवाराची घोषणा केली.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसापासून सुरु असलेले महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास फायनल झाले आहे. त्यामध्ये काँग्रेसच्या वाट्याला आठ जागा आल्या आहेत तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला चार तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुणे, सातारा-सांगली, ठाणे-पालघर या तीन जागा आल्या आहेत. त्यानंतर लगेचच पुण्यातील जागेवरील उमेदवाराची घोषणा केली तर आता सातारा-सांगली विधानपरिषदेच्या जागेसाठी दोघांची नावे चर्चेत आहेत. 'या' दोघांपैकी एकाला उमेदवारी दिली जाणार आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक राहिलेले आहेत. महायुतीमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु असताना दुसरीकडे महाविकास आघाडीने सर्वच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेत अघडाई घेतली आहे. त्यानुसार काँग्रेस 8 जागा, शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे.

सातारा-सांगलीमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच

सातारा-सांगली स्थानिक स्वराज संस्था या मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला होता. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे मोहनराव कदम राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेखर गोरे यांचा पराभव करुन विजयी झाले होते. मोहनराव कदम यांनी शेखर गोरे यांच्यापेक्षा 63 जास्त मतं मिळवत विजयी झाले होते.

आता सातारा सांगली स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडे गेला आहे. या मतदारसंघात सातारा जिल्ह्यात माजी मंत्री बाळासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नावांची चर्चा आहे. सांगली जिल्ह्यातून या मतदारसंघातून कोण इच्छुक असणार यासंदर्भातील नावं अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे येत्या काळात या दोन नेत्यांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

सातारा आणि सांगली स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील मतदारांची संख्या 853 इतकी आहे. दोन्ही जिल्ह्यात मिळून 315 मतदार भाजपकडे आहेत. यानंतर दुसऱ्या स्थानी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी असून त्यांचे 205 मतदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे 119 मतदार आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकेडे 111,काँग्रेसकडे 73 आणि अपक्ष 30 आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे 1 मतदार आहे.

दरम्यान, महायुतीकडे सातारा सांगलीत मिळून 630, महाविकास आघाडीकडे 193 आणि अपक्ष 30 अशी मतदारसंख्या आहे. प्रत्यक्षात काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका भाजपनं स्वबळावर लढवलेल्या होत्या. त्यामुळं मित्रपक्षांच्या मदतीवरच भाजपचा या मतदारसंघातील विजय अवलंबून असेल. महायुतीत भाजपकडून सातारा जिल्ह्यातून उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. सुनील काटकर, धैर्यशील कदम, शेखर गोरे आणि मकरंद देशपांडे यांच्या नावांची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT