MLC ELection : विधानपरिषदेसाठी सातारा भाजपला 'वनवे'; सांगली जिल्हा फिरवू शकतो गेम; एकत्र आल्यास राष्ट्रवादीला आमदारकीची 'संधी'

MLC Election : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
Sangli-Satara local authority constituency is expected to witness intense political competition in the upcoming Maharashtra MLC elections.
Sangli-Satara local authority constituency is expected to witness intense political competition in the upcoming Maharashtra MLC elections.Sarkarnama
Published on
Updated on

Sangli-Satara local body election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यायच्या विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचाही समावेश आहे. या निवडणुकीसाठी 1 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून 18 जून रोजी मतदान पार पडणार आहे. तर 22 जूनरोजी मतमोजणी होणार आहे.

सांगली-सातारा हा मतदारसंघ यााधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारल्याने यंदा आमदारकीसाठी भाजपला संधी दिसून येत आहे. संख्याबळाच्या आभावी आघाडीसाठी इथून विजय संपादन करणे काहीसे अवघड बनले आहे. महायुतीतही भाजप आणि राष्ट्रवादीत या जागेसाठी जोरदार रस्सीखेच होऊ शकते. या दोन्ही पक्षात युती न झाल्यास कांटे की टक्कर बघायला मिळू शकते.

सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेची निवडणूक नोव्हेंबर 2016 मध्ये पार पडली होती. यात राष्ट्रवादीच्या शेखर गोरे यांचा पराभव करत काँग्रेसच्या मोहनराव कदम यांनी विजय मिळवला होता. निवडून येण्यासारखी मते असतानाही राष्ट्रवादीची मते मोठ्या प्रमाणात फुटली होती. कदम यांच्या आमदारकीचा 2022 ला कार्यकाळ संपल्यानंतर गेली 3 वर्ष ही निवडणूक रखडली होती.

आता नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात भाजपने मोठी मजल मारली आहे. फुटीमुळे राष्ट्रवादीला दोन्ही जिल्ह्यात विशेषतः सातारा जिल्ह्यात फटका बसला. सांगली जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये मात्र राष्ट्रवादीने चांगल्या जागा जिंकत विधानपरिषद निवडणुकीत स्पर्धा वाढवली आहे.

Sangli-Satara local authority constituency is expected to witness intense political competition in the upcoming Maharashtra MLC elections.
MLC Election News : विधानपरिषदेचा धुराळा : नाशिकमध्ये पुन्हा ‘दराडे पॅटर्न’? भाजप-शिवसेना समीकरणांवर सगळ्यांची नजर

2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्रात प्रभावशाली होण्यासाठी धडपडत राहिला. ग्रामपंचायतीपासून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजपने प्रत्येक निवडणुकीत नियोजन पद्धतीने वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना भाजपात घेऊन पक्ष संघटन मजबूत केले. त्याचा फायदा आताच्या निवडणुकीमध्ये भाजपला दिसून आला.

सध्याची आकडेवारी बघितल्यास साताऱ्यामध्ये भाजपकडे 139 मते आहेत. तर शिवसेनेकडे 16, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 55, काँग्रेसकडे 1, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 1 आणि स्थानिक आघाडीकडे 46 मते आहेत. थोडक्यात महायुती म्हणून किंवा स्वतंत्र निवडणूक लढवली तरी साताऱ्यात भाजपकडे एकहाती बहुमत आहे.

दुसरीकडे सांगली जिल्ह्यात भाजपला मोठी फिल्डिंग लावावी लागू शकते. सांगलीत भाजपकडे 93 मते आहेत. तर शिवसेनेकडे 44, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 65, काँग्रेसकडे 52, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 84 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 1 मत आहे.

दोन्ही जिल्ह्यांतील स्थिती पाहिल्यास सातारा जिल्ह्यात भाजपचे पारडे जड आहे, पण सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वरचढ ठरू शकते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीप्रमाणेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक एकत्र येऊन लढल्यास भाजपसमोर आव्हान उभे राहू शकते. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस जागा जिंकू देखील शकते.

Sangli-Satara local authority constituency is expected to witness intense political competition in the upcoming Maharashtra MLC elections.
MLC Election News : विधानपरिषदेचा धुरळा : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपचे वर्चस्व; संभाजीनगर-जालना मतदारसंघात कमळ फुलणार?

दोन्ही जिल्ह्यात महायुतीमध्ये मोठी फूट :

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान सातारा व सांगली जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपपासून फारकत घेत निवडणूक लढवली होती. भाजपने दोन्ही जिल्ह्यात केलेली दादागिरी, साताऱ्यात मंत्री जयकुमार गोरे आणि सांगलीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल असलेला असंतोष दिसून आला.

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद निवडणुकीत देखील शिवसेना-राष्ट्रवादी आणि भाजपमधील अंतर्गत वाद दिसून आला होता. राष्ट्रवादी-शिवसेनेची ताकद असूनही भाजपने प्रशासनाचा वापर करून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला, असा आरोप मंत्री शंभुराज देसाई यांनी केला होता. यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपवर अद्यापही नाराज आहे.

सांगली जिल्हा परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे महत्त्व अधिक आहे. सांगलीमध्येही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. सध्या जिल्हा परिषदेत दोन्ही पक्ष एकत्रितपणे सत्तेत आहेत. महापालिकेमध्येही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मिळून 19 नगरसेवक आहेत. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीची रणनीती काय असू शकते हे देखील काही दिवसांनी स्पष्ट होईल.

एकूणच सध्या महायुतीमध्ये भाजपचे संख्याबळ अधिक आहे. पण भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधात लढल्यास या निवडणुकीला अधिक रंगत येणार आहे. महायुती म्हणून एकत्र लढायचे झाल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कशी साथ देणार हे पहावे लागणार आहे. थोडक्यात सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक ही केवळ संख्याबळाची नसून, राजकीय डावपेचांची लढत ठरणार आहे.

इच्छुकांची फिल्डिंग :

या निवडणुकीसाठी भाजपकडून सातारा जिल्ह्यातील विक्रम पावसकर, धैर्यशील कदम आणि सत्यजित पाटणकर यांची नावे इच्छुकांमध्ये आहेत. शेखर गोरे यांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारकीचा शब्द दिला आहे. राष्ट्रवादीकडून अद्याप कोणाचे नाव पुढे आलेले नाही. पण माणचे नेते प्रभाकर देशमुख इच्छुक आहेत. सांगलीतून संजयकाका पाटील, सम्राट महाडिक, वैभव पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com