Ajit Pawar, Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Crisis : नगर जिल्ह्याचा शरद पवारांना पाठिंबा; राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'या' आमदारांची भूमिका स्पष्ट

Ahmednagar NCP News : रोहित पवारांनी व्यक्त केली उद्विग्न प्रतिक्रिया

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे

Ajit Pawar Vs Sharad Pawar : राज्यात रविवारी (ता. २ जुलै) राजकीय भूकंप घडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनी इतर आठ नेत्यांसह शिंदे-फडवणीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यावेळी अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आदी आठ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्याला अजित पवार यांच्यासोबत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार उपस्थित दिसले. (Latest Political News)

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार निलेश लंके, नगरचे आमदार संग्राम जगताप, अकोल्याचे आमदार किरण लहामटे शपथविधी सोहळ्याला होते. तर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे शरद पवार यांच्यासोबत पुण्यामध्ये होते. राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे तटस्थ होते. तर कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे सध्या विदेशात असल्याचे समजते. त्यामुळे त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

दरम्यान, पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी सोशल मीडियाद्वारे भावना व्यक्त केल्या. निलेश लंके यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे मला परिवारासारखे असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक परिवार आहे. त्यातील मी एक छोटा घटक आहे असे म्हटले आहे. त्याच बरोबर येत्या दोन एक दिवसात परिस्थिती बदलेल असा आशा त्यांनी व्यक्त केली. एकूणच निलेश लंके काल मंत्रिमंडळ सोहळ्याला उपस्थित असले तरी आज त्यांची भूमिका काहीशी तटस्थ किंवा शरद पवार यांच्या बाजूने असल्यास दिसून येत आहे. (Ahmednagar News)

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे शरद पवारांचे नातू आहेत. त्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या सर्व घडामोडी पाहता राजकारणात कशासाठी आलो एकंदरीत सर्व हा सत्तेचा खेळ, यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट केलेले आहे. राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटील यांचे सख्खे भाचे आहेत. त्यामुळे तेही शरद पवार यांच्या सोबतच असणार हे स्पष्ट आहे. अकोल्याचे आमदार किरण लहामटे शपथविधी सोहळ्यास उपस्थित होते. आता मात्र ते तटस्थ असल्याचे समजते.

नगरचे आमदार संग्राम जगताप हे मात्र अजित पवार यांच्या बाजूने उभे असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचीही भूमिका अद्याप स्पष्ट नाही त्यामुळे एकंदरीत अहमदनगर जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या सहा आमदारांपैकी जवळपास तीन ते चार आमदार हे शरद पवार यांच्यासोबत असतील असे एकूण चित्र आहे.

Edited by Sunil Dhumal

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT