Kolhapur Nagarpalika Mayor 2025 : कोल्हापूर जिल्ह्यात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीनं मोठं यश मिळवलं असून महाविकास आघाडीला मोठ्या पिछेहाटीला समोरं जावं लागलं आहे. या निवडणुकीत महायुतीमध्ये सामिल ८ पॅनलचा ११ नगरपालिकांमध्ये विजय झाला असून महाविकास आघाडीतील केवळ २ पॅनललाच आपलं खातं खोलता आलं आहे.
पन्हाळा, हुपरी, कागल, मुरगुड, आजरा, मलकापूर, चंदगड, गडहिंग्लज, कुरुंदवाड, हातकणंगले, जयसिंगपूर, शिरोळ, पेठ वडगाव इथल्या नगरपालिकांसाठी निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला असून त्यांचे तब्बल १३ पैकी ११ नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तर केवळ दोन जागांवर महाविकास आघाडीला यश मिळालं आहे.
पन्हाळा - जयश्री प्रकाश पोवार, जनसुराज्य शक्ती (महायुती)
हुपरी - मंगलराव माळगे, भाजपा (महायुती)
कागल - सविता माने, राष्ट्रवादी काँग्रेस (महायुती)
मुरगुड - सुहासिनी देवी पाटील, शिवसेना (महायुती)
आजरा - अशोक चराटी, ताराराणी आघाडी भाजप (महायुती)
मलकापूर - रश्मी कोटावळे, जनसुराज्य शक्ती (महायुती)
चंदगड - सुनील काणेकर, भाजप (महायुती)
गडहिंग्लज - महेश तुरंबतमट, राष्ट्रवादी काँग्रेस (महायुती)
कुरुंदवाड - मनीषा डांगे, यड्रावकर राजर्षी शाहू आघाडी (महायुती)
हातकणंगले - अजित पाटील, शिवसेना (महायुती)
जयसिंगपूर - संजय यड्रावकर, राजश्री शाहू आघाडी (महायुती)
शिरोळ - योगिता कांबळे, शिवशाहू आघाडी (महाविकास आघाडी)
पेठ वडगाव - विद्याताई पोळ, यादव आघाडी (महाविकास आघाडी)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.