Suhas Kande Politics: नांदगावला सुहास कांदे यांचाच डंका; समीर भुजबळ यांना धक्का, सर्व जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी!

Nandgaon Council Election Shivsena MLA Suhas Kande Candidate Sagar Hire & all candidates Win, set back for Sameer Bhujbal -शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने नांदगावला बाजी मारली, नगराध्यक्ष सागर हिरे यांसह सर्व उमेदवार विजयी
Nandgaon Shivsena celebration, Suhas Kande
Nandgaon Shivsena celebration, Suhas KandeSarkarnama
Published on
Updated on

Nandgaon News: नांदगाव नगरपालिका निवडणुकीत आमदार सुहास कांदे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्यात चुरस होती. त्यात आमदार कांदे यांनी बाजी मारली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर माजी खासदार समीर भुजबळ यांचा दुसऱ्यांदा पराभव झाला.

नांदगाव नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. यामध्ये सुरवातीपासूनच सर्व जागांवर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेेदवार आघाडीवर राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते माजी खासदार समीर भुजबळ यांना या निवडणुकीत धक्का बसला.

नगराध्यक्ष पदाचे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार सागर हिरे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राजेश बनकर यांना त्यांनी पराभूत केले. प्रभाग दहा मधील अपक्ष काशिनाथ देशमुख यांचा एकमेव अपवाद होता. मात्र या जागेवर भाजपने दावा केला होता. त्यात भाजपचा पराभव झाला.

Nandgaon Shivsena celebration, Suhas Kande
Suhas Kande Politics: नांदगावला आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांना मागे टाकले, पहिल्याच फेरीत शिवसेनेच्या उमेदवाराला मोठी आघाडी!

या निवडणुकीत आमदार कांदे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी पॅनल उभे केले आहे. या दोन्ही परागत राजकीय विरोधकांमध्ये नगरपालिका निवडणुकीत चुरस आहे. त्यात दोन्ही नेत्यांचे प्रतिष्ठा पणाला लागली आहे. थेट नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे पक्षाचे सागर हिरे विजयी झाले.

शिवसेना शिंदे पक्षाचे विजयी उमेदवार असे, प्रभाग १ अ: सौ, कल्पना वाल्मिक जगताप, प्रभाग १ ब: वाल्मिक हरिदास टिळेकर, प्रभाग ३ अ: कसबे पिंट्या अभिमन, प्रभाग ३ ब: राजेश भागवत शिंदे मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.

Nandgaon Shivsena celebration, Suhas Kande
Yeola Election Result : भुजबळांनी हॉस्पिटलमधून गड राखला, राजेंद्र लोणारींचा दणदणीत विजय.. दराडे बंधूंना चारली धूळ..

प्रभाग ५ अ: स्नेहल सुरज पाटील, प्रभाग ५ ब: शेख सईद रशीद, प्रभाग ७ अ: बाळू गोपाळा शेंदरे, प्रभाग ७ ब: रुपाली चेतन पाटील, प्रभाग ८ अ: पृथ्वीराज शिरीष पाटील, प्रभाग ९ अ: काका वनाजी सोळशे, प्रभाग ९ ब: राखी महावीर जाधव, प्रभाग १० अ: गायत्री प्रकाश शिंदे, प्रभाग १० ब: काशिनाथ फकीरराव देशमुख हे विजयी झाले.

नांदगाव नगरपरिषदेच्या सात जागांवर आमदार कांदे गटाचे नगरसेवक बिनविरोध आले होते. आज झालेल्या मतमोजणीत तेरा जागांवर याच पक्षाचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे आमदार कांदे यांनी नांदगावची सत्ता राखली आहे.

या निवडणुकीत माजी खासदार समीर भुजबळ शेलटच्या टप्प्यात सक्रीय झाले होते. त्यातच महाविकास आघाडीतील विस्कळीतपणा मोठा अडथळा ठरला. तालुक्यातील बहुतांश नेते आमदार कांदे यांच्या गोटात दाखल झाल्याने विरोधक शिल्लकच राहिले नव्हते.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com