Prashant Kortkar mobile data deletion : नागपूरचा प्रशांत कोरटकर हा किती 'चतूर' आहे, याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. डेटा डिलिट करून त्याने मोबाईल पोलिसांकडे सादर केला असल्याचे पोलिसांनी जिल्हा न्यायालयाला सांगितले.
प्रशांत कोरटकर याने त्याचा हा मोबाईल त्याची पत्नीकरवी नागपूर सायबर पोलिसांकडे सादर केल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
कोल्हापूरमधील इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मोबाईलवरून धमकावणारा प्रशांत कोरटकर याने डेटा डिलिट करून मोबाइल पोलिसांकडे सादर केल्याची माहिती पोलिसांनी जिल्हा न्यायालयात (Court) दिली. दरम्यान, वकिलांच्या विनंतीनंतर दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी कोरटकरच्या अंतरिम जामिनात एक दिवसाची वाढ केली होती. प्रशांत कोरटकर याने सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर राहावे की नको, याबाबत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला. त्यावर आज, बुधवारी सुनावणी होणार आहे.
संशयित कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. कोल्हापुरातील जुना राजवाडा आणि नागपुरातील (Nagpur) बेलतरोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रशांत कोरटकर याने सुरवातीला हे आरोप फेटाळत, माझा मोबाईल हॅक करून वॉयस मॉर्फिंग करून हा प्रकार केल्याचा दावा केला होता.
पण, गुन्हे दाखल होताच, कायद्याचा फास आवळला जातच, कोरटकर हा पसार होत, कायद्यामार्फत संरक्षण मिळवू लागला आहे. प्रशांत कोरटकर याने त्याचा मोबाईल पत्नीकरवी नागपूर सायबर पोलिसांकडे सादर केला. न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर पोलिसांनी तो कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिसांना दिला.
मात्र, मोबाइलमध्ये कॉल डिटेल्स असले तरी संभाषणाचे रेकॉर्डिंग नाही. डेटा डिलिट करून त्याने मोबाईल पोलिसांकडे सादर केल्याची माहिती न्यायालयात दिली. कोरटकरच्या वकिलांनी आणखी एक दिवस अंतरिम जामीन वाढवून मागितला होता. त्याला न्यायाधीशांनी परवानगी दिली. कोरटकरने सुनावणीसाठी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहावे, असा अर्ज पोलिसांनी केला. त्याला कोरटकरच्या वकिलांना आक्षेप घेतला आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.