
Maharashtra politics news : "आम्ही गुंडगिरी करत नाही. परंतु तुमचे तसे म्हणणे असेल, तर तुमच्याशी गुंडगिरी करण्याची आमची तयारी आहे. तुम्ही सांगा आम्ही दोन हात करू, तुम्ही वेळ सांगा, असे आव्हान देत सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीमधील वातावरण आपण असुरक्षित होऊ देणार नाही", असा इशारा खासदार नीलेश लंके यांनी दिली.
खासदार लंके यांनी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे यांचे नाव न घेता, खासदार लंकेंनी सूचक इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना याबाबत पत्र दिले, असून शरद पवार यांच्या माध्यमातून लवकर पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहे, असेही खासदार लंकेंनी सांगितले.
खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी प्रत्येक महिन्यातील एक रविवार गड किल्ले संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे. याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली. याचवेळी खासदार लंकेंना सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीसंदर्भात होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपासंदर्भात विचारल्यावर आक्रमक भूमिका मांडली.
खासदार लंके यांनी नगर शहरातील एमआयडीसीची काय अवस्था झाली? असा प्रतिप्रश्न करत, वसाहत बंद पडली आहे, याकडे लक्ष वेधले. 'आरोप करणाऱ्यांनी त्यांच्या भागात एखादा उद्योग आणावा. सुपा एमआयडीसीमध्ये (MIDC) कोणाचीही तक्रार नाही. तरीही उठसूट सांगायचे की गुंडगिरी थांबवा. गुंडगिरी कोणाची आहे? ते त्यांनी नाव घेऊन सांगावे. जर तुम्हाला वाटत असेल की, आम्ही गुंडगिरी करतो, त्यावर आमचे म्हणणे आहे की आम्ही गुंडगिरी करत नाही', असे खासदार लंकेंनी सांगितले.
'परंतु, तुमचे म्हणणे असेल, तर तुमच्याशी गुंडगिरी करण्याची आमची तयारी आहे. आमच्याकडे ताकद आहे, तुम्ही सांगा आम्ही दोन हात करू, तुम्ही वेळ काळ सांगा. पाठीमागून याला त्याला त्रास देण्याचे काम करू नका. मी 'एमआयडीसी'चे वातावरण असुरक्षित होऊ देणार नाही', असा इशारा देखील खासदार लंकेंनी दिला.
यंत्रणेचा गैरवापर करून तहसीलदार, प्रांत यांना औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांच्या गौण खनिजाची चौकशी करा, नोटीस बजवा असे पालकमंत्र्यांकडून सांगितले जाते आहे, असा गंभीर आरोप खासदार लंकेंनी केला. वास्तविक पाहता एमआयडीसीने प्लॉट दिल्यानंतर उद्योगाचे काम सुरू असताना तिथे महसूल विभागाने जाण्याचा काय सबंध? उद्योजकांची पिळवणूक कशी करता? त्यांच्यावर जास्तीत जास्त दंडात्मक कारवाई कशी करता येईल, असा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप खासदार लंकेंनी केला.
मधल्या काळामध्ये हद्दच केली, असे म्हणत, कामगार आयुक्तांना सांगून सर्व कामगार आणि ठेकेदारांचे सर्व परवाने रद्द केले. सर्व नियमात असताना, उद्योजकही हे ठेकेदार पात्र आहेत, असे सांगतात. असे असतानाही सर्व परवाने रद्द करायचा घाट घातला गेला. एकाच दिवशी सर्व परवाने रद्द झाले तर औद्योगिक वसाहत बंद पडेल, अशी भीती खासदार लंकेंनी व्यक्त केली.
उद्योग मंत्र्यांसमवेत बैठक बोलावून एमआयडीसीचा विभागीय अधिकारी सांगेल, तसे उद्योजकांनी ऐकले पाहिजे, असे बंधन घालण्याचा प्रयत्न केला गेला. उद्योजकाला प्लॉट वितरीत करण्याचे विभागीय अधिकाऱ्याचे काम आहे. त्यानंतर त्यांचा काहीही सबंध नाही. कोणाला कॉन्ट्रक्ट द्यायचे हे ठरविणारे विभागीय अधिकारी कोण? एमआयडीसीमध्ये जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिले, असून शरद पवार यांच्या माध्यमातून मी नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांनाही पत्र दिले असून त्यात सगळा घटनाक्रम नमूद करण्यात आल्याचे खासदार लंकेंनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.