Bhaskar Jadhav : "आमची भूमी डॉलर देणारी आहे, आम्हाला 20 हजार कोटी द्या अन् तेही..."; भास्कर जाधवांची सभागृहात मागणी, सत्ताधारी विरोधक पाहतच राहिले

Maharashtra Budget Session 2025 : राज्याचा अर्थ संकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला आहे. त्यावर विधामंडळात आज चर्चा झाली. यावेळी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी देखील भाग घेताना सरकारवर टीका करताना अजित पवार यांना राज्याला आर्थिक शिस्त लावा अशी मागणी केली आहे.
Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhavsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचा अर्थ संकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. यानंतर आज (ता.11) अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू झाली. या वेळी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी देखील सरकारवर जोरदार टीका करताना लोकप्रिय योजनांमुळे राज्याच्या आर्थिक घडी विस्कटली असून आता शिस्त लावा असे आवाहन अजित पवार यांना केलं आहे. यावेळी त्यांनी कोकणाच्या विकासासाठी देखील अजित पवार यांनी प्रयत्न करावे, असे मागणी केली आहे.

यावेळी भास्कर जाधव यांनी आर्थिक पाहणी अहवालाचा मुद्दा उपस्थित करताना राज्यातील उत्पन्नातील सेवा उद्योग क्षेत्राचा दर घटला आहे. सरकार दावोसचा संदर्भ देत असून रोजगाराचे नव नवे दावे करत आहे. पण हे दावे पोकळ असल्याचे भास्कर जाधव म्हणालेत. तर राज्यातील महायुती सरकारने ज्या लाडक्या बहिणींच्या जीवावर राज्यात सत्ता मिळवली त्यांना देखील आता धोका देण्याचे काम केलं आहे. फक्त लाडक्या बहिणीच नाही तर लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांना देखील वाऱ्यावर सोडले आहे. लाडक्या वृद्धांना तीर्थ क्षेत्र योजनेतून आता गंगेत तरी सोडून आला नाहीत का ते पाहावं असा टोला लगावला आहे.

चर्चेच्या शेवटी भास्कर जाधव यांनी कोकणाच्या विकासाचा मुद्दा मांडताना, अजित पवार यांनी कोकणाच्या कनेक्टविटीसाठी विमानतळ उभारले जाईल, येथे रस्त्यांचे काम प्रगती पथावर असल्याचा उल्लेख आपल्या अर्थसंल्पाच्या मांडणीत केला होता. त्यावर देखील भास्कर जाधव यांनी जोरदार हल्लाबोल करताना, आमच्याकडे कनेक्टविटीचा मोठा प्रश्न आहे. ज्या विमानतळाची घोषणा दादांनी केली ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. तेथ पर्यंत जाण्यापेक्षा आम्ही बाय रोड मुंबईत पोहचू यामुळे रत्नागिरीसाठी देखील विमानतळाची गरज आहे. तर रेल्वेची फ्रिक्वेन्सीही वाढवण्याची गरज असल्याचा मुद्दा भास्कर जाधव यांनी मांडला.

Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav : 'बघतोच तुला आता', भास्कर जाधव भाजप आमदाराला भिडले, विधासभेत सुनावलं

गेल्या अनेक वर्षांपासून आपण राजकारणात असून सत्तेत आणि सत्तेच्या बाहेर आहे. अजित पवार देखील अनेक वर्ष अर्थमंत्री म्हणून काम करत आहेत. पण त्यांनी आतापर्यंत कोकणाला भरभरून कधीच काहीच दिलेलं नाही. कदाचित कोकणामधील लोक बँकेचं कर्ज घेतलं तर ते बुडवत नाही. कोणाचाही महसूल बुडवत नाहीत. त्यामुळेच कोकणाकडे दुर्लक्ष केलं जातयं असा आरोप देखील भास्कर जाधव यांनी केला आहे. तसेच त्यांनी गेल्या 10 वर्षापासून आपण सभागृहात एकच मागणी करत असून कोकणाच्या आर्थिक वृद्धीकरणाचा हट्ट धरत आहे.

कोकणाचा विकास साधायचा असेल तर पर्यटन, मत्स्य आणि फळबागांसाठी स्पेशल पॅकेज द्या, अशी मागणी त्यांनी केली. आम्हाला फक्त 20 हजार कोटींचा परतीचा निधी द्या. कर्ज द्या जे पाच वर्षाकरिता असेल ज्यातून मूलभूत सुविधा उभ्या करता येतील. आमच्या कोकणाची भूमी डॉलर भूमी आहे. आज मासे, आंबे आम्ही प्रदेशामध्ये पाठवतो. तेच देशाला राज्याला डॉलर देतात. महाराष्ट्रात येणारे पर्यटक कोकणात येतात ते डॉलर देताता.

Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav : विरोधी पक्षनेतेपदाचे प्रबळ दावेदार भास्कर जाधवांच्या घरातच बंडाळी, चुलत भाऊ बाळाशेठ शिंदेसेनेत दाखल

त्यामुळे राज्याचा अर्थकारण सुधारण्याकरता आमच्या कोकणाला आर्थिक मदत करा. आंब्यासाठी रायझिंग सेंटर, काजूसाठी योजना करा. आमच्याकडे सुपारीच्या बागा नारळीच्या बागा असून स्वच्छ असा कोकण समुद्र किनारा आहे. पाहुण्याचा पाहुणचार करणारी आमची संस्कृती असून याचा लाभ पर्यटनासाठी होत आहे. पर्यटन वाढण्यासाठी कोकणाचा विकास साधण्यासाठी आम्हाला 20 हजार कोटींची विशेष मदत करा अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com