Nana Patole News 
पश्चिम महाराष्ट्र

Nana Patole News : कॉंग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यास...; नाना पटोलेंचा इशारा

काँग्रेस पक्षाने एकमताने नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती.

सरकारनामा ब्युरो

Congress News काँग्रेस पक्षाने एकमताने नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या घरातील असलेला अंतर्गत वाद हा आम्हाला त्यावेळेस माहीत नव्हता. त्यांच्या वादात आम्हाला पडायचे नाही. कोणी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यास जशास-तसे उत्तर दिले जाईल,’’ असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी दिला.

आमदार नाना पटोले हे काँग्रेसचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते विनायक देशमुख यांच्या कुटुंबातील एक सोहळ्यासाठी अहमदनगरला आले होते. त्याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, ॲड. प्रताप ढाकणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी महापौर अभिषेक कळमकर आदी उपस्थित होते.

पटोले म्हणाले, की उमेदवारी देताना कोर कमिटीची बैठक झाल्यानंतर सर्व त्यावर चर्चा झाली. नाशिकची जागा ही काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना देण्याचा निर्णय केला होता. त्या संदर्भात आम्ही दोन एबी फॉर्म त्यांना कोरे पाठवलेले होते. त्यांच्या घरामधला अंतर्गत विषय हा आम्हाला कोणत्याही प्रकारे माहीत नव्हता. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी नुकतीच चर्चा केली. ही चर्चा गुलदस्त्यातच ठेवणार आहे. त्यावर योग्य वेळी आपण बोलणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला.

राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी हे सतत वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यांनी महापुरुषांचा वेळोवेळी अपमान केला. अशा या राज्यपालाला या राज्यांमध्ये राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यांची हकालपट्टी केली पाहिजे, अशीच महाराष्ट्रातील जनतेची आणि काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. पुण्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या दोन्ही जागेसाठी दोन फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. यात या दोन्ही जागा महाविकास आघाडी लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तर भाजपच्या भूमिकेचे स्वागत करू

माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात हे सध्या आजारी आहेत. मात्र ते माझ्या संपर्कात आहेत, ते पक्षाबरोबर आहेत, असे आत्तापर्यंत ते मला सांगत आहे. ते पक्षाचे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांना आदेश देण्याचे काहीच कारण नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार सर्वाधिक मतांनी निवडून येईल, असा दावा त्यांनी केला. नाशिक पदवीधर मतदार संघांमध्ये सत्यजित तांबे यांना भाजपने पाठिंबा दिला, तर निश्चितच भाजपच्या या भूमिकेचे आपण स्वागतच करू, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT